अवकाशातून कोसळलेले 'ते' अवशेष चिनी यानाचेच: 'आयुका'चा निष्कर्ष | IUCAA | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Chandrapur Rocket remains found Bodra forest
अवकाशातून कोसळलेले 'ते' अवशेष चिनी यानाचेच: 'आयुका'चा निष्कर्ष | IUCAA

अवकाशातून कोसळलेले 'ते' अवशेष चिनी यानाचेच: 'आयुका'चा निष्कर्ष

या महिन्याच्या सुरुवातीला 2 एप्रिल रोजी रात्री महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये अवकाशातून काही अवशेष पडले होते. हे अवशेष उपग्रह वाहून नेणाऱ्या अवकाशयानाचे असल्याचा निष्कर्ष पुणे विद्यापीठातील आयुका (Inter-University Centre for Astronomy and Astrophysics- IUCAA) या संस्थेने काढला आहे. अवकाशातून मराठवाडा, विदर्भ तसेच खानदेशातील काही भागांमध्ये पडले होते. या घटनेचे व्हिडीओसुद्धा समोर आले होते. अवकाशातून पडलेले हे अवशेष नेमके कशाचे याबाबत सर्वांनाच उत्सुकता होती.

दोन एप्रिल रोजी चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यात लाडबोरी गावलगतच्या शेतात उपग्रह वा यानाचे तुकडे पडल्याने (Meteorite or satellite pieces) सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे. विदर्भात अनेकांना रात्रीच्या अवकाशात रहस्यमय प्रकाश दिसल्यामुळे उल्कापात झाल्याची चर्चा होती. मात्र, लाडबोरी येथे धातूच्या पत्र्याचे मोठे तुकडे आढळून आल्यामुळे हा प्रकार उल्कापाताचा नसल्याचेही स्पष्ट झालं होते. (Remains of the Chinese spacecraft that fell from space: IUCAA)

हेही वाचा: Chandrapur: अवकाशातून काल पडलेला तो तुकडा चायनीज रॉकेटचा?

दरम्यान पुण्यातील ‘आयुका’ संस्थेने लाडबोरी (जि.चंद्रपूर), अमरावती आणि खानदेशातील काही भागांत अवकाशातून कोसळलेले पेटते अवशेष हे उपग्रह वाहून नेणार्‍या अवकाशयानाचे असल्याचा दावा केला आहे. या दिवशी कोणत्या देशाचं यान त्या परिघातून जाणार होतं याचा अभ्यास करून आयुकातील शास्त्रज्ञांनी (Scientist) हा निष्कर्ष काढला आहे.

Web Title: Remains Of The Chinese Spacecraft That Fell From Space Said Iucaa

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top