दादा भुसेंना पालकमंत्रिपदावरून हटवा; भाजप नेत्यानेच केली मागणी; Maharashtra Politics | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Maharashtra Politics

Maharashtra Politics: दादा भुसेंना पालकमंत्रिपदावरून हटवा; भाजप नेत्यानेच केली मागणी

शिंदे गट आणि भाजप यांच्यातील आता अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले आहेत. शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे यांना नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून हटवण्याची मागणी भाजपच्याच नेत्याने केली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. (Remove Dada Bhuse as Guardian Minister BJP leader demanded )

मालेगाव मधील भाजपचे नेते अद्वय हिरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून दादा भुसे यांची नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदावरून हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे. अद्वय हिरे यांच्या मागणीमुळे बाळासाहेबांची शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी यांच्यातील वाद पुन्हा एकदा समोर आली आहे.

हेही वाचा: Prasad Lad: शिवाजी महाराजांबद्दलच्या वादग्रस्त व्यक्तव्यानंतर प्रसाद लाड म्हणाले...

काय आहे कारण?

मालेगाव मधील बोरे आंबेदरी येथील पाण्याची चारी बंद करण्याचा निर्णय भुसे यांनी घेतल्याने शेतकरी आणि भाजप नेते संतप्त झाले आहे. शनिवारी याच विषयावरून एका शेतकऱ्याने विष प्राशन केलं होतं. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. चारी बंद करून पाईपलाईनद्वारे पाणी नेल्यास या भागातील अनेक शेतकऱ्यांची जमीन ओसाड होऊन पिके उद्ध्वस्त होण्याची भीती आहे.

हेही वाचा: Prasad Lad: भाजपच्या अडचणीत वाढ? शिवरायांचा जन्म कोकणात; प्रसाद लाडांचे वादग्रस्त वक्तव्य

दादा भुसे हे ठेकेदाराला पोसण्यासाठी चारी बंद करुन पाईपलाईद्वारे पाणि पिण्याचा घाट घालत असल्याचा आरोप भाजप नेत्याने केला आहे.

टॅग्स :dada bhuse