
रेणापूरः 'मराठा समाजाला हैद्राबाद गॅझेट लागू करून सरकारने ओबीसींचं आरक्षण संपविलं आहे.. आता ओबीसींच्या आरक्षणाचं काय होईल..' अशी चिंता व्यक्त करत व घोषणा देत बुधवारी सायंकाळी वांगदरी, ता. रेणापूर येथील भरत महादेव कराड (वय ३५) या तरुणाने मांजरा नदीपात्रात उडी मारून आत्महत्या केली. त्याने ओबीसींच्या आरक्षणाबाबत चिंता व्यक्त करणारी चिठ्ठीदेखील लिहून ठेवली आहे.