

republic day rain forecast maharashtra
esakal
District wise weather Maharashtra : मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यासह राज्यातील बहुतांश भागात सध्या अंशतः ढगाळ हवामान असून पहाटेच्या वेळी काही ठिकाणी धुक्याची स्थिती आहे. दुपारच्या सुमारास उन्हाचा चटका वाढत असून, नागरिकांना काहीसा उकाडा जाणवत आहे. राज्याच्या किमान तापमानात वाढ कायम राहण्याची शक्यता असून, थंडी कमी-अधिक स्वरूपाची राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.