पुणे : राज्य सरकारतर्फे अनुसूचित जातींमधील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या दुर्बल समाजाला न्याय देण्यासाठी आरक्षणाचे अ, ब, क, ड असे वर्गीकरण करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. याची घोषणा लवकरच केली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली.