esakal | तिसऱ्या लाटेच्या उंबरठ्यावर गुरू शिष्यांचे आंदोलन!
sakal

बोलून बातमी शोधा

doctor

तिसऱ्या लाटेच्या उंबरठ्यावर गुरू शिष्यांचे आंदोलन!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : जिवाची पर्वा न करता दुसऱ्या लाटेचा सामना निवासी डॉक्टरांपासून तर अस्थायी वैद्यकीय शिक्षकांनी केला.निवासी डॉक्टरांना शुल्क माफीचे तर अस्थायी डॉक्टरांनी कायम करण्याचे आश्वासन देऊनही राज्य सरकारने पाळले नाही. यामुळे विद्यार्थी असलेले निवासी डॉक्टर आणि वैद्यकीय शिक्षक असलेले अस्थायी कोरोना योद्धे यांनी राज्य सरकारच्या विरोधात ऐन तिसऱ्या लाटेचे संकट घोंघावत असताना एल्गार पुकारला आहे. निवासी डॉक्टरांनी शुक्रवारपासून तर अस्थायी वैद्यकीय शिक्षकांनी सोमवार ४ ऑक्टोंबरपासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे.

निवासी डॉक्टरांचा तीन वर्षांच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमात २० महिने कोरोना रुग्णांची सेवा करण्यात लोटले. यामुळे वैद्यकीय शिक्षण खात्याने शैक्षणिक शुल्क माफ करण्याचे आश्वासन दिले. मात्र, या आश्वासन सरकारने पाळले नाही. यामुळे राज्यभरातील ५ हजार निवासी डॉक्टरांनी संप पुकारण्याचा निर्णय घेतला आहे. यात मेडिकल आणि मेयोचे ८०० निवासी डॉक्टर संपावर असतील. यामुळे मेयो, मेडिकलमधील रुग्णसेवा कोलमडणार आहे.

अस्थायी वैद्यकीय शिक्षक आझाद मैदानात

मेयो,मेडिकलसह राज्यात साडेचारशे अस्थायी पद्धतीवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सेवा देत आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षा घेत नव्हते. अशातच कोरोनाचे संकट आले. या कोरोनाच्या संकटकाळात हेच अस्थायी वैद्यकीय शिक्षक कोरोना योद्धे म्हणून राबले. त्यांना स्थायी करण्याचे आश्वासन वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिले. मात्र, हे आश्वासन न पाळता एमपीएससीची जाहिरात प्रकाशित करून या वैद्यकीय शिक्षकांच्या तोंडाला पाने पुसली. यामुळे संतप्त झालेल्या अस्थायी वैद्यकीय शिक्षकांनी इशारा म्हणून २ ऑक्टोंबरला मेणबत्ती मार्च काढून निषेध केला जाईल. तर ४ ऑक्टोंबरपासून ४५० अस्थायी वैद्यकीय शिक्षक आझाद मैदानात आंदोलन करणार आहेत.

राज्यभरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात एक ऑक्टोबरपासून सामूहिक रजा आंदोलन सुरू होणार आहे. सेंट्रल मार्डतर्फे आलेल्या सूचनांची अंमलबजावणी आम्ही करणार आहोत. अजनी पोलिस ठाण्यातही नोटीस दिली. मात्र कायद्यामुळे एका ठिकाणी गोळा होता येत नाही. याचे पालन करणार

-डॉ. सजल बन्सल, अध्यक्ष, मार्ड, नागपूर.

राज्यात चारशेवर सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक अस्थायी सेवेत नियमित सेवा देत आहेत. सेवा स्थायी करण्याचे आश्वासन वैद्यकीय शिक्षण संचालक यांच्यापासून तर वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी दिले. मात्र ते आश्वासन न पाळता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत पदांची जाहिरात प्रकाशित केली. यामुळे अस्थायी शिक्षकांचे आंदोलन आहे.

-डॉ. समीर गोलावार, सचिव, महराष्ट्र मेडिकल टीचर्स असोसिएशन,महाराष्ट्र

loading image
go to top