Ranjitsinh Disale: ग्लोबल टीचर पुरस्कार विजेत्या डिसले गुरूजींचा राजीनामा अखेर नामंजूर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

disale guruji

ग्लोबल टीचर पुरस्कार विजेत्या डिसले गुरूजींचा राजीनामा अखेर नामंजूर

सोलापूर : सोलापूरातील ग्लोबल टीचर पुरस्कार विजेते शिक्षक रणजितसिंह डिसले यांचा राजीनामा नामंजूर करण्यात आला आहे. शिक्षण विभागाने त्रास दिल्याच्या कारणावरून काही दिवसांपूर्वी डिसले गुरूजींनी राजीनामा दिला होता त्यानंतर ही बाब मुख्यमंत्र्यांपर्यंत गेल्यावर, "त्यांच्यावर अन्याय होऊ देणार नाही आणि त्यांच्यावर कारवाई होणार नाही." असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी दिला होता. त्यानंतर शिक्षणाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे.

सोलापूरचे शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी हा राजीनामा नामंजूर केला असून हा राजीनामा नामंजूर होण्यासाठी बऱ्याचजणांकडून प्रयत्न केले जात होते. दरम्यान, शिक्षण अधिकाऱ्यांनी पत्रक काढून मला मिळालेल्या अधिकारानुसार हा राजीनामा प्रशासकीय कारणास्तव नामंजूर करण्यात येत असल्याचं सांगितलं आहे.

हेही वाचा: Video: नाशिकमध्ये पातेल्यात बसून विद्यार्थी ओलांडतात नदी

दरम्यान, काही दिवसांपूर्वी सोलापूर जिल्हा शिक्षण विभागाने त्यांच्यावर कारवाईचा बडगा उचलला होता. त्यानंतर डिसले यांच्या समर्थनार्थ अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती. डिसले यांच्यावरील आरोपानंतर त्यांच्या चौकशी अहवालात सुद्धा त्यांच्यावर आरोप करण्यात आले होते. पण हे आरोप खोटे असल्याचं नंतर समोर आलं होतं. रणजितसिंह डिसले यांनी राजीनामा दिल्यावर अनेकांनी त्यांचा राजीनामा नामंजूर होण्यासाठी प्रयत्न केले होते. पण अखेर त्यांचा राजीनामा नामंजूर करण्यात आला आहे.

Web Title: Resignation Of Global Teacher Award Winner Ranjit Disle Rejected

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top