
बारावीचा १० जूनपूर्वी तर दहावीचा २० जूनपूर्वी निकाल! पुरवणी परीक्षा जुलैअखेरीस
सोलापूर : दहावी-बारावीच्या निकालाची तयारी युध्दपातळीवर सुरु असून माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने सर्व उत्तरपत्रिका संबंधित विभागीय कार्यालयाकडे जमा करण्याचे निर्देश दिले आहेत. ३० एप्रिल ते ५ मेपर्यंत सर्व उत्तरपत्रिका त्याठिकाणी जमा होतील. त्यानंतर १० जूनपूर्वी बारावीचा तर २० जूनपूर्वी दहावीचा निकाल जाहीर होईल, असे बोर्डातील वरिष्ठ सूत्रांकडून सांगण्यात आले.
हेही वाचा: उध्वस्त ठरकी ने कुठे नेऊन ठेवला आहे आमचा महाराष्ट्र? अमृता फडणवीसांचा टोला
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर दहावी-बारावीची परीक्षा ऑफलाईन पध्दतीने पार पडली. राज्यातील जवळपास ३१ लाख विद्यार्थ्यांनी दहावी-बारावीची परीक्षा दिली. कोरोनामुळे दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना अर्ध्या तासाचा वाढीव वेळ देण्यात आला होता. त्यामुळे तणावमुक्त वातावरणात बहुतेक विद्यार्थ्यांनी त्यांच्याच शाळेत परीक्षा दिली. एसटीचा संप आणि कोरोनाचा धोका, यामुळे बोर्डाने यंदा विद्यार्थ्यांसाठी चांगली सोय केली होती. परीक्षा झाल्यानंतर सर्व शिक्षकांच्या मेहनतीतून उत्तरपत्रिका तपासून आता पूर्ण झाल्या आहेत. प्रत्येक शिक्षकास दोनशे ते अडीचशे पेपर तपासायला दिले होते. त्या उत्तरपत्रिका तपासून पूर्ण झाल्यानंतर त्याचे संकलन आता सुरु होणार आहे. बोर्डाकडून निकालाची तयारी सुरू झाली आहे. सुरवातीला बारावीचा निकाल जाहीर होईल. त्यानंतर पुढील दहा दिवसांत दहावीचा निकाल लागेल. जेणेकरून विद्यार्थ्यांना पुढील प्रवेशाला कोणतीही अडचण येणार नाही हा हेतू बोर्डाचा आहे.
हेही वाचा: महापालिका निवडणुकीसाठी महाआघाडीचा ४०: ४० :३३ फॉर्म्युला
दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी काही अडचणी येणार नाहीत, यादृष्टीने निकालाची तयारी सुरु आहे. ३० एप्रिल ते ५ मेपर्यंत सर्व उत्तरपत्रिका विभागीय कार्यालयात जमा होतील. त्यानंतर निकाल जाहीर होईल.
- शरद गोसावी, अध्यक्ष, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे
हेही वाचा: सावकारांचे खरेदीखत रद्द! शेतकऱ्यांना परत मिळाली 1300 एकर जमीन
ठळक बाबी...
- राज्यातील १६ लाख ३१ हजार विद्यार्थ्यांनी दिली दहावीची परीक्षा
- बारावीसाठी १४ लाख ८७ हजार विद्यार्थी बसले होते
- ३० एप्रिल ते ५ मे या काळात विभागीय कार्यालयात पोहोच होतील उत्तरपत्रिका
- १० जूनपर्यंत बारावीचा तर २० जूनपर्यंत दहावीचा निकाल जाहीर करण्याचे नियोजन
हेही वाचा: आजीच्या देखभालीस आलेल्या मुलीची कथा! १४ व्या वर्षी पहिले बाळ अन् १५व्या वर्षी पुन्हा गर्भवती
जुलैअखेरीस पुरवणी परीक्षा
दहावी-बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर बोर्डाकडून निकालानंतरची संपूर्ण कामे होतील. त्यानंतर या परीक्षेत अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची पुरवणी परीक्षा घेतली जाणार आहे. सध्या त्याचेही नियोजन सुरु आहे. साधारणत: जुलैअखेरीस ही पुरवणी परीक्षा सुरु होईल, असेही बोर्डातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
Web Title: Result Of 12th Class Before 10th June And 10th Result Before 20th June Supplementary Examination At The End Of
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..