
अलिबाग : सध्या सर्वत्र मुसळधार पाऊस पडत आहे. समुद्रातील लाटांचीही उंची कमी झालेली नाही. वाऱ्याचा वेगही कमी झालेला नाही. यामुळे गेटवे मांडवा फेरीबोट सेवा १ सप्टेंबरपासून सुरु होण्यात अनिश्चितता निर्माण झाली आहे. हवामान विभागानेही पुढील तीन दिवस अतिवृष्टीचा इशारा दिलाय, त्यामुळे ओहटीची स्थिती पाहूनच फेरीबोट सुरु करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे.