Environment Poetry: कवितेतून पर्यावरण संवर्धनाची नवी दृष्टी : डॉ. विठ्ठल वाघ यांचे प्रतिपादन, ‘रानफुले’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन

कवितेतून पर्यावरण संवर्धनाची नवी दृष्टी जोपासण्याचे आवाहन; ‘रानफुले’ काव्यसंग्रहातून जल-जंगल-जमीन वाचवण्याचा संदेश
Poetry as a Tool for Environmental Conservation: Dr. Vitthal Wagh

Poetry as a Tool for Environmental Conservation: Dr. Vitthal Wagh

Sakal

Updated on

पारनेर : "कविता वाचकांना डोळस बनवते. काव्यामधून आलेला शुद्ध सर्जनशील विचार मानवाला नवीन दृष्टी देतो. कवितेतून पर्यावरण संवर्धनाची दृष्टी जोपासली जाणे महत्वाचे असून वने, पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत विकासासाठी साहित्य निर्मिती व्हावी." असे विचार ज्येष्ठ साहित्यिक व लोककवी डॉ. विठ्ठल वाघ यांनी व्यक्त केले. जागतिक वसुंधरा दिनाचे औचित्य साधून, कॉन्फरन्स हॉल, वनभवन, गोखलेनगर येथे साहित्यविश्व प्रकाशन आयोजित, सेवानिवृत्त प्रधान मुख्य वनसंरक्षक डॉ. शेषराव पाटील लिखित 'रानफुले' या काव्यसंग्रहाच्या प्रकाशन समारंभावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com