
आज तीन मार्च. आजच्या दिवशी, इसवी सन 1700 साली छत्रपती शिवरायांचे दुसरे पुत्र असणारे छत्रपती राजाराम महाराज यांचे निधन झाले. हा प्रसंग अडचणीत असलेल्या मराठेशाहीसाठी एक फार मोठा धक्का होता. काही दिवसांपूर्वी आलेल्या 'छावा' चित्रपटात तुम्ही पाहिले असेल की छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर महाराणी येसूबाईंनी राजाराम महाराजांना छत्रपती घोषित केले. मात्र, पुढील अकरा वर्षांत अनेक मोठ्या घडामोडी घडल्या.
राजाराम महाराज औरंगजेबासमोर एका पर्वतासारखे उभे राहिले आणि लढले. एवढेच नव्हे, तर दिल्ली जिंकण्याची महत्त्वाकांक्षा त्यांनी व्यक्त केली होती, याचे पुरावे उपलब्ध आहेत. अत्यंत महत्त्वाकांक्षी असलेल्या या छत्रपतींना मात्र फारसे आयुष्य लाभले नाही. अवघ्या 29 व्या वर्षी त्यांचे निधन झाले. आज आपण छत्रपती राजाराम महाराजांचा इतिहास जाणून घेऊया.