Rickshaw Drivers Strike : रिक्षा संघटना आक्रमक; 'या' दिवसापासून पुन्हा करणार आंदोलन

28 नोव्हेंबर रोजी रिक्षा चालकांनी बेमुदत बंद पुकारला होता.
Rickshaw
Rickshawsakal

शहरातील बाईक टॅक्सी विरोधात आरटीओ विभागाने कारवाई करावी, बाईक टॅक्सीचे अॅप बंद करावे या मागण्सायांसाठी 28 नोव्हेंबर रोजी रिक्षा चालकांनी बेमुदत बंद पुकारला होता. या बंदमध्ये 12 पेक्षा जास्त रिक्षा संघटना सहभागी झाल्या होत्या. या रिक्षा बंदमुळे सर्वसामान्य नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागले होते.

प्रशासनाच्या आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं. 11 डिसेंबर पूर्वी बेकायदा बाईक टॅक्सी बंद करण्यात येईल असे आश्वासन प्रशासनाने दिले होते. त्यानंतर मात्र प्रशासनाकडून कोणताही निर्णय घेतला गेलेला नाही.

हेही वाचा : किस्से बँकेच्या लाॅकररुममध्ये घडलेले...एका बँक अधिकाऱ्याच्याच तोंडून

Rickshaw
Rickshawsakal

'बघतोय रिक्षावाला' संघटनेचे अध्यक्ष केशव क्षीरसागर यांनी सांगितले की, ''नागरीकांची गैरसोय लक्षात घेता आम्ही अगोदरचे आंदोलन स्थगित केले. पाच दिवस झाल्यानंतर सुद्धा आजतागायत समिती स्थापन करण्याबाबत अधिकाऱ्यांकडून उडवा उडवीची उत्तरे देण्यात येत आहेत''

12 डिसेंबर पासून पुन्हा आंदोलन सुरू झाले आणि नागरिकांची गैरसोय झाली तर त्याची सर्वस्वी जबाबदारी भ्रष्ट अधिकाऱ्यांची असेल असा इशारा संघटनेने दिला आहे.

Rickshaw
Prasad Lad: ''प्रसाद लाड तुम्ही लायकीत राहा'' पुण्यातील कार्यकर्त्यांनी दिला 'हा' इशारा

11 डिसेंबर पूर्वी बेकायदा बाईक टॅक्सी बंद करण्यात येईल असे आश्वासन प्रशासनाने दिले होते. त्यानंतर कोणताही निर्णय झाला नाही. त्यामुळे रिक्षा आंदोलन समितीकडून पुणे आरटीओ बाहेर "तारखेचे काऊंट डाऊन" असलेला फलक लावण्यात आला आहे. रिक्षा संघटनेच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर पुण्यासह, पिंपरी चिंचवड मध्ये 12 डिसेंबर पासून पुन्हा रिक्षा बंद ठेवण्याचा इशाराही रिक्षा संघटनांनी दिला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com