गेल्या ११ महिन्यात राज्यात २ हजार २७० शेतकऱ्यांच्या आत्महत्या

पूजा विचारे
Thursday, 7 January 2021

गेल्या ११ महिन्यात महाराष्ट्र राज्यात २ हजार २७० शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

मुंबईः गेल्या ११ महिन्यात महाराष्ट्र राज्यात २ हजार २७० शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी तसेच बऱ्याच योजनेनंतर सुद्धा शेतकऱ्यांची आत्महत्या कमी झालेल्या नाहीत असंच चित्र राज्यात दिसत आहे. 

माहिती अधिकारात मिळवलेल्या माहिती नुसार, एकूण २ हजार २७० शेतकऱ्यांनी १ जानेवारी २०२० ते ३१ नोव्हेंबर २०२० या काळात म्हणजेच मागच्या ११ महिन्यात आत्महत्या केलेल्या आहेत. त्यापैकी फक्त ९२० शेतकऱ्यांना प्रत्येकी एक लाख रुपये महाराष्ट्र सरकार कडून अनुदान मिळालेले आहेत.  २०१९ मध्ये २ हजार ८०८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आणि त्यापैकी १ हजार ५७८ शेतकरी कुटुंबांना एक लाख रुपये अनुदान देण्यात आलं आहे.

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
 
दरवर्षीप्रमाणे या वर्षीही विदर्भात सगळ्यात जास्त आत्महत्या

दरवर्षीप्रमाणे या वर्षीही विदर्भात सगळ्यात जास्त आत्महत्या झालेल्या आहेत आणि सगळ्यात जास्त शेतकऱ्यांना अनुदान नाकारण्यात आलेला आहे. एकूण ९९० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत त्यात फक्त ३४८ शेतकरी कुटुंबांना अनुदान मिळाले तर तब्बल ४११ शेतकरी कुटुंबांना अनुदान नाकारण्यात आलेला आहे. विदर्भातील यवतमाळ आणि अमरावती जिल्ह्यात सगळ्यात जास्त म्हणजेच २९५ आणि २४८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत.

हेही वाचा- अवघ्या तीन दिवसात पोलिस भरतीचा जीआर गृहविभागाकडून रद्द

Right to information Maharashtra farmer more than two thousand farmer ended their life


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Right to information Maharashtra farmer more than two thousand farmer ended their life