देशात दंगली घडवण्याचा कट- राज ठाकरे (व्हिडीओ) 

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 4 डिसेंबर 2018

देशात दंगली घडवण्याचा कट रचला जात असून पुढील काही दिवसात राम मंदिराचा मुद्दा तापवला जाणार असल्याचा खळबळ जनक दावा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला. राम मंदिर निश्‍चित व्हायला हवं. पण, ते 2019 च्या लोकसभा निवडणुकीनंतर व्हायला हवे असेही राज ठाकरे यावेळी म्हणाले.

मुंबई : देशात दंगली घडवण्याचा कट रचला जात असून पुढील काही दिवसात राम मंदिराचा मुद्दा तापवला जाणार असल्याचा खळबळ जनक दावा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला. राम मंदिर निश्‍चित व्हायला हवं. पण, ते 2019 च्या लोकसभा निवडणुकीनंतर व्हायला हवे असेही राज ठाकरे यावेळी म्हणाले.

विक्रोळी येथील एका कार्यक्रमात बोलताना दिल्लीहून आलेल्या एका निनावी फोन वरुन ही माहिती देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. ओवेसी सारख्या लोकांशी बोलणी सुरु असल्याचा दावाही त्यांनी केला. यावेळी बोलताना त्यांनी भाजप सरकारवर तोफ डागली. सध्याच्या नाकर्त्या सरकारला हिंदू मुस्लिम दंगलीवर निवडणूक लढवायची आहे असा गंभीर आरोपही त्यांनी केला. आज पर्यंत रामाची हनुमानाची जात विचारली नाही. मात्र, हि मंडळी अशी विधानं करुन जाती धर्मांमध्ये आगी लावायचे उद्योग करत आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ एकदाही विकासावर बोलत नाही अशा शब्दात त्यांनी भाजपचा समाचार घेतला.
 

हिंदू मुस्लिम मतांच ध्रुवीकरण करायचं आणि मतं मागायची. हा एककलमी कार्यक्रम आता सरकारचा असेल.राज्यात आणि देशात वाढलेली बेरोजगरी हा प्रश्‍न गंभीर असतानाच भलतेच विषय पुढे आणून देशाच्या राजकरणाला कलाटणी देण्याचा कट आखला जात आहे. लोकांच्या धार्मिक भावनांशी खेळून पुन्हा सत्तेत यायचे हा या मागचा उद्देश असल्याचा आरोपही राज ठाकरे यांनी केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Riots In The Country With The Help Of Owaisi Says Raj Thackeray