esakal | इंधनाचा उडणार भडका; पेट्रोल-डिझेल आणखी महागणार ! 'ही' आहेत कारणे
sakal

बोलून बातमी शोधा

पेट्रोल-डिझेल आणखी महागणार! 'ही' आहेत कारणे

22 सप्टेंबरला क्रूड ऑईलची किंमत प्रतिबॅरल 70.70 डॉलर होती. परंतु, आता त्याची किंमत 74.99 डॉलरवर पोचली आहे.

पेट्रोल-डिझेल आणखी महागणार! 'ही' आहेत कारणे

sakal_logo
By
तात्या लांडगे : सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : जागतिक बाजारपेठेत क्रूड ऑईलची (Crude oil) किंमत दिवसेंदिवस वाढू लागली आहे. 22 सप्टेंबरला क्रूड ऑईलची किंमत प्रतिबॅरल 70.70 डॉलर होती. परंतु, आता त्याची किंमत 74.99 डॉलरवर पोचली आहे. इंधनाची मागणी वाढल्याने काही दिवसांत क्रूड ऑईलची किंमत 80 डॉलरवर जाण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे पेट्रोल (Petrol) -डिझेलचे (Diesel) दर अंदाजित दोन ते तीन रुपयांपर्यंत वाढतील, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

इराक, इराण, सौदी अरेबिया व दुबई, तुर्कस्तानात हे क्रूड ऑईल तयार होते. ग्लोबल वॉर्मिंगनुसार यंदा अमेरिका व इंग्लंडसह काही देशांमध्ये अधिक थंडी पडेल, असा अंदाज आहे. त्यामुळे क्रूड ऑईलची मागणी वाढली आहे. या पार्श्‍वभूमीवर प्रतिबॅरल क्रूड ऑईलच्या किमतीतही वाढ होऊ लागली आहे. राज्यात यंदा 43 लाख 976 किलोलिटर पेट्रोल तर जवळपास 96 लाख किलोलिटर डिझेलचा खप झाला आहे. कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर देशभरातील निर्बंध उठविले जात आहेत. त्यामुळे रस्त्यांवरील वाहनांची गर्दी वाढत असून, वाहनांची विक्रीही जोमात आहे. त्यामुळे इंधनाची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे.

सध्या पेट्रोलचे दर 107 रुपयांपेक्षा अधिक असून डिझेलचा दर 97 रुपयांपेक्षा जास्त आहे. इंधनाचे दर वाढत असल्याने केंद्र सरकारने त्यांचा टॅक्‍स कमी करावा, अशी मागणी राज्य सरकारने केली आहे. तर राज्य सरकारने टॅक्‍समध्ये थोडीशी कपात करावी, अशी मागणी होऊ लागली आहे. परंतु, ना केंद्र ना राज्य सरकारने टॅक्‍समध्ये कपात केली. त्यामुळे आगामी काळात आणखी इंधन दरवाढ निश्‍चित आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे.

हेही वाचा: Solapur : 'विठ्ठल'च्या संचालकांचा वाद पवारांच्या दरबारात!

ग्लोबल वॉर्मिंगनुसार अमेरिका व इंग्लंड या देशांमध्ये थंडी वाढण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. इंधनाची मागणी वाढू लागल्याने क्रूड ऑईलचे दर जागतिक बाजारपेठेत वाढत आहेत. त्यामुळे इंधनाचे दर वाढण्याची शक्‍यता आहे.

- मंदार केळकर, उपसचिव, जीएसटी, मुंबई

इंधनाचे असे आहेत दर

 • पेट्रोल (प्रतिलिटर)

 • मूळ किंमत : 49.97 रुपये

 • केंद्र सरकारचा टॅक्‍स : 32.90 रुपये

 • राज्य सरकारचा टॅक्‍स : 21.28 रुपये

 • विक्रेता कमिशन : 3.68 रुपये

 • एकूण किंमत : 107.83 रुपये

हेही वाचा: Solapur : मुंबई-हैदराबाद बुलेट ट्रेनच्या मार्गात बदल नाहीच!

 • डिझेल (प्रतिलिटर)

 • मूळ किंमत : 41.49 रुपये

 • केंद्र सरकारचा टॅक्‍स : 31.80 रुपये

 • राज्य सरकारचा टॅक्‍स : 21.28 रुपये

 • विक्रेता कमिशन : 2.58 रुपये

 • एकूण किंमत : 97.15 रुपये

loading image
go to top