esakal | 'विठ्ठल'च्या संचालकांचा वाद पवारांच्या दरबारात! संचालक मंडळाची आज पुण्यात बैठक
sakal

बोलून बातमी शोधा

'विठ्ठल'च्या संचालकांचा वाद पवारांच्या दरबारात!

विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळातील वाद आता शरद पवारांच्या दरबारात गेला आहे.

Solapur : 'विठ्ठल'च्या संचालकांचा वाद पवारांच्या दरबारात!

sakal_logo
By
भारत नागणे - सकाळ वृत्तसेवा

पंढरपूर (सोलापूर) : विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या (Vitthal Co-operative Sugar Factory) संचालक मंडळातील वाद आता शरद पवारांच्या (Sharad Pawar) दरबारात गेला आहे. अंतर्गत वाद मिटवून कारखाना सुरू करता येईल का, या विषयावर आज खुद्द कारखान्याचे जन्मदाते शरद पवारांनीच संचालक मंडळाची आज (शुक्रवारी) पुण्यात बैठक बोलावली आहे. या बैठकीत शदर पवार संचालकांना कोणता कानमंत्र देतात, याकडेच पंढरपुरातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, धाराशिव साखर कारखान्याचे (Dharashiv Sugar Factory) अध्यक्ष अभिजित पाटील (Abhijit Patil) यांनी कारखान्याचे अध्यक्ष भगीरथ भालके (Bhagirath Bhalke) यांच्यासह संचालक मंडळावर केलेल्या आरोपानंतर शरद पवार हे झाडाझडती घेण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे.

पंढरपूरच्या राजकारणात आणि अर्थकारणात अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडणारा विठ्ठल सहकारी साखर कारखाना मागील काही वर्षापासून आर्थिक संकटात सापडला आहे. मागील वर्षीच्या गाळप हंगामात गाळप केलेल्या उसाच्या एफआरपीसह कामगार आणि तोडणी वाहतूकदारांचे पैसे अद्याप दिले नसल्याने कारखान्यावर

हेही वाचा: राष्ट्रपती शौर्यपदक विजेते! खाकी वर्दीतील सिंघम हर्षद काळे

जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. अशातच यंदाच्या गाळप हंगामाविषयी साशंकता निर्माण झाली आहे. त्यामुळे सध्याच्या संचालक मंडळाविषयी सभासदांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा: डॉक्‍टर अपहरण : अखेर सात किडनॅपर मुद्देमालासह पोलिसांच्या जाळ्यात

सभासदांच्या उसाचे पैसे मिळत नसल्याने सध्या अध्यक्षासह संचालक मंडळाला लोकांसमोर फिरणे देखील मुश्‍कील झाले आहे. अशा परिस्थितीमध्ये शरद पवार यांची भेट घेऊन साखर कारखाना सुरू करण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी त्यांना विनंती केली होती. त्यानुसार शरद पवार यांनी आज (शुक्रवारी) दुपारी चार वाजता पुणे येथील साखर संकुलामध्ये कारखान्याचे अध्यक्ष भगीरथ भालके यांच्यासह सर्व संचालकांना बैठकीचे निमंत्रण दिले आहे. कारखान्याचे प्रभारी कार्यकारी संचालक श्री. करपे यांच्यासह सर्व संचालकांना बैठकीचा निरोप देण्यात आला आहे. बैठकीमध्ये शरद पवार कारखान्याच्या संदर्भात कोणता निर्णय घेतात, याकडेच सभासदांचे लक्ष लागले आहे. अभिजित पाटील यांनी केलेल्या आरोपासंदर्भात देखील पवार संचालकांची कानउघाडणी करण्याची शक्‍यता देखील व्यक्त केली जात आहे.

loading image
go to top