Miss You Pappa म्हणत रितेश झाला भावूक

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 ऑगस्ट 2019

राज्यभरातून आज विलासराव देशमुखांना अभिवादन करण्यात येत आहे. लातूरमध्ये आयोजित कार्यक्रमात पूर्ण देशमुख कुटुंबाने त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

लातूर : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेस नते विलासराव देशमुख यांचा आज (बुधवार) सातवा स्मृतीदिन असून, त्यानिमित्त रितेश देशमुखने ट्विट करून मिस यू पापा असे म्हटले आहे.

राज्यभरातून आज विलासराव देशमुखांना अभिवादन करण्यात येत आहे. लातूरमध्ये आयोजित कार्यक्रमात पूर्ण देशमुख कुटुंबाने त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. रितेशने ट्विट करत म्हटले आहे, की सात वर्षांचा काळ खूप मोठा आहे. मला हे काल झाल्यासारखेच वाटत आहे. मिस यू पापा...

लोकांतील...लोकांचे...लोकनेते स्व. विलासराव देशमुख यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र आदरांजली!, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ritesh Deshmukh tweet for Vilasrao Deshmukh death anniversary