esakal | भाऊ मंत्री होताना रितेशचा भरला अभिमानाने ऊर; विधानभवनात उपस्थिती
sakal

बोलून बातमी शोधा

Ritiesh Deshmukh attends oath taking ceremony of Amit Deshmukh in mumbai

आजही जेव्हा आपला थोरला भाऊ अमित कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेणार म्हटल्यावर रितेश वेळात वेळ काढून विधानभवनात शपथविधी सोहळ्यासाठी उपस्थित राहिला आहे. 

भाऊ मंत्री होताना रितेशचा भरला अभिमानाने ऊर; विधानभवनात उपस्थिती

sakal_logo
By
वृत्तसंस्था

मुंबई : राज्यातील महाविकासआघाडी सरकारचा आज (सोमवार) पहिल्यांदा विस्तार होत आहे. आज शपथ घेणाऱ्या 36 मंत्र्यांची नावे यापूर्वीच उघड झाली आहेत. यामध्ये 25 कॅबिनेट आणि 10 राज्यमंत्र्यांचा समावेश आहे. यामध्ये लातूरचे आमदार अमित देशमुखांचाही समावेश आहे. आपल्या थोरल्या भावाचा शपथविधी सोहळा पाहण्यासाठी अभिनेता रितेश देशमुखसुद्धा मोठ्या कौतुकाने विधानभवनात उपस्थित राहिला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

अमित आणि धीरज अशा दोन्ही भावंडांच्या प्रचारासाठीसुद्धा रितेश आणि त्याची पत्नी जेनिलियाने अनेक सभांमध्ये सहभाग घेतला होता. रितेशने प्रत्येकवेळी उत्स्फूर्तपणे भाषण करत नागरिकांना देशमुख चिरंजीवांना मत देण्याची विनंती केली होती. 

शरद पवार अजित पवारांना म्हणाले, संधीचं सोनं करा; 14 नावे निश्चित

आजही जेव्हा आपला थोरला भाऊ अमित कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेणार म्हटल्यावर रितेश वेळात वेळ काढून विधानभवनात शपथविधी सोहळ्यासाठी उपस्थित राहिला आहे. 

राज्यातील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकासआघाडी सरकारचा आज पहिला मंत्रिमंडळ विस्तार होत आहे. या विस्तारात शिवसेनेचे 13, राष्ट्रवादीचे 13 आणि काँग्रेसचे 10 आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. अजित पवार हे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबतची यादी राजभवनाला पाठविली आहे. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे, अहमद पटेल हे उपस्थित राहणार आहेत.