Andheri East Bypoll Result 2022: ''भाजपला सहानुभूती नव्हतीच'' विजयानंतर ऋतुजा लटके भावूक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rutuja Latake

Andheri East Bypoll Result 2022: ''भाजपला सहानुभूती नव्हतीच'' विजयानंतर ऋतुजा लटके भावूक

मुंबईः अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीमध्ये ऋतुजा लटके यांचा विजय झाला आहे. साधारण ५३ हजार मतांनी त्यांचा विजय झाल्याचं सांगण्यात येतंय. काही वेळात त्यांच्या विजयाची अधिकृत घोषणा होईल. त्यापूर्वी ऋतुजा लटकेंनी माध्यमांशीव संवाद साधला. यावेळी त्या भावूक झाल्या होत्या.

यावेळी बोलतांना ऋतुजा लटके म्हणाल्या की, हा विजय म्हणजे जनसेवेची पोचपावती आहे. स्व. रमेश लटके यांनी अंधेरीच्या विकासाचा ध्यास घेतला होता. त्यांचं स्वप्न आपण पूर्ण करणार, असं सांगतांना त्या भावूक झाल्या.

पुढे बोलतांना लटके म्हणाल्या की, भाजपला सहानुभूती नव्हती. ती असती तर त्यांनी सुरुवातीलाच उमेदवार दिला नसता. त्यांना सर्व्हेमध्ये सगळं कळलं होतं. त्यामुळे त्यांनी त्यांचा उमेदवार मागे घेतला.

हेही वाचाः भारतीय महिलांचा सुरक्षित गुंतवणुकीकडेच का असतो ओढा?

'नोटा'वर बोलतांना त्या म्हणाल्या की, 'नोटा'वर मतं देण्यासाठी प्रचार करण्यात आला. त्याच्या व्हीडिओ क्लिपदेखील समोर आलेल्या आहेत. परंतु महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांनी ताकदीने मला साथ दिल्याने हा विजय सोपा झाल्याचं त्यांनी सांगितंल. शिवाय आपण आज 'मातोश्री'वर आशीर्वाद घेण्यासाठी जाणार असल्याचं लटकेंनी सांगितलं.