esakal | नितीन गडकरी मला तुमची मदत हवी आहे - मुख्यमंत्री ठाकरे
sakal

बोलून बातमी शोधा

CM uddhav thackeray thanks to mr. nitin gadkari

नितीन गडकरी मला तुमची मदत हवी आहे - मुख्यमंत्री ठाकरे

sakal_logo
By
वैदेही काणेकर

मुंबई: "पावसामुळे रस्त्यांवर मोठे खड्डे पडतात. खड्डेमुक्त (pothole) रस्ते करण्यासाठी नितीन गडकरी (Nitin gadkari) मला तुमची मदत हवी आहे, महाराष्ट्राला त्याची गरज आहे. रस्ते असे बनले पाहिजेत की, पुढच्या पिढ्यान् पिढ्या त्यावर खड्डे पडणार नाहीत" असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. (Road transport minister nitin gadkari i need your help cm uddhav thackeray dmp92)

"अनेक ठिकाणी घाट खचलेले आहेत. पूल वाहून गेलेले आहेत. तुमच्याकडचं नवीन तंत्रज्ञान मला रस्ते बांधकामासाठी वापरायचं आहे. पुरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होतय. अनेक अडचणींचा सामना सध्या राज्याला करावा लागतोय" असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. ते नागपूरच्या कडबी चौक ते गोळीबार चौक दरम्यान नवीन रेल्वे उड्डाण पुलाच्या भूमिपूजन कार्यक्रमात बोलत होते. सध्याच्या कोविड स्थितीमुळे उद्धव ठाकरे ऑनलाइन या कार्यक्रमात सहभागी झाले होते.

हेही वाचा: भर रस्त्यात दादर स्टेशनवर महिलेला मारली मिठी, आरोपीला अटक

"पर्यावरण पूरक रस्ते बांधण्यासंदर्भात सध्या विचार सुरू आहे. जेणेकरून जंगलाचही जतन व्हावं. राज्य आणि केंद्र शासनाने एकत्र येऊन काम करावे यामध्ये कोणतेही राजकारण आणू नये" असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

loading image
go to top