भर रस्त्यात दादर स्टेशनवर महिलेला मारली मिठी, आरोपीला अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

rape case

भर रस्त्यात दादर स्टेशनवर महिलेला मारली मिठी, आरोपीला अटक

मुंबई: दादर रेल्वे स्थानकात (dadar railway station) नेहमीच प्रवाशांची गर्दी असते. लोकांची वदर्ळ असलेल्या या भागामध्ये काही वेळा गर्दीचा फायदा घेऊन आरोपींकडून गुन्हे केले जातात. यामध्ये चोरीपासून ते विनयभंगापर्यंत (molestation) गुन्ह्यांचा समावेश आहे. गुरुवारी दादर रेल्वे स्थानकातून जाणाऱ्या एका महिलेला असाच धक्कादायक अनुभव आला. (Labourer held for groping woman at Mumbais Dadar station dmp82)

महिला रेल्वे स्थानक परिसरातून चालत असताना, अचानक एका व्यक्तीने तिला मिठी मारली. सुरुवातीला महिला गोंधळून गेली. पण नंतर तिने लगेच आरडाओरडा सुरु केल्यानंतर आरोपीला पकडण्यात आले. संजय यादव (२८) असे आरोपीचे नाव असून पेशाने तो मजूर आहे. आरोपी वडाळा भागामध्ये राहतो.

हेही वाचा: फोटोग्राफर्समुळे श्रद्धा कपूरचं खासगी चॅट झालं व्हायरल

दादर रेल्वे पोलिसांनी विनयभंगाच्या आरोपाखाली त्याला अटक केली आहे. पीडित महिला कल्याण येथे रहायला असून मध्य मुंबईत ती नोकरी करते. गुरुवारी पावणेपाचच्या सुमारास महिला बदलापूर लोकल पकडण्यासाठी फर्स्ट क्लास डब्ब्याच्या दिशेने जात असताना हा प्रकार घडला. सहप्रवाशी आणि तिथे असलेल्या रेल्वे पोलिसांनी आरोपी संजय यादवला पकडले.

loading image
go to top