रोहा : 'त्या' हत्या प्रकरणातील फरार आरोपी अखेर गजाआड|Roha crime update | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

culprit arrested
रोहा : 'त्या' हत्या प्रकरणातील फरार आरोपी अखेर गजाआड

रोहा : 'त्या' हत्या प्रकरणातील फरार आरोपी अखेर गजाआड

रोहा : रायगडच्या रोहा पोलिसांनी (Roha police) एका २५ वर्षीय व्यक्तीला एका भंगार विक्रेत्याच्या हत्या (scrap dealer murder) प्रकरणात अटक केलीय. विकास चव्हाण असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं (culprit arrested) नाव आहे. विकासने रोह्यात मंगलवाडी येथे राहणाऱ्या अमित सिंगची (३६) हत्या करुन तो फरार झाला होता. मात्र, पोलिसांनी पाठवलेल्या समन्सला त्यानं कोणताही प्रतिसाद न दिल्याने पोलिसांचा विकासवर संशय अधिक बळावला. त्यानंतर रोहा पोलिसांनी आरोपी विकासचा शोध घेत त्याला अखेर अटक केली. ( roha police arrested Culprit vikas chavan in scrap dealer amit singh murder case)

हेही वाचा: गुजरात किनाऱ्यावर पाकिस्तानी बोट जप्त; 10 जण ताब्यात

"अमित सिंगच्या हत्येप्रकरणी अटक केलेला आरोपी विकास उस्मानाबाद जिल्ह्यातील आहे. पोलीस स्टेशनमध्ये अमित सिंग बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी पुढील तपासासाठी विकासला समन्स पाठवलं होतं. सिंगच्या वडिलांना विकासने अमितची हत्या केल्याचा संशय होता."

"कर्जामुळं अमित बेपत्ता झाला असावा, अशी माहिती प्राथमिक चौकशीत मिळाली होती. मात्र विकासला चौकशीसाठी समन्स पाठवल्यावर तो फरार झाल्याने त्याच्यावर संशयाची सुई फिरकत होती," अशी माहिती रोहा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पाटील यांनी दिली.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :policeCrime News
loading image
go to top