Eknath Khadse News : ....तरीही मी शरद पवारांसोबतच!; रोहिणी खडसे यांनी स्पष्ट केली भूमिका

Maharashtra Politics News : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार एकनाथ खडसे यांनी भाजपमध्ये घरवापसी करणार असल्याची घोषणा आज केली
Rohini Khadse on Eknath Khadse joining bjp Sharad Pawar NCP jalgaon Marathi politics news
Rohini Khadse on Eknath Khadse joining bjp Sharad Pawar NCP jalgaon Marathi politics news

जळगाव, ता. ६ : ‘‘नाथभाऊंची भारतीय जनता पक्षात घरवापसी झाली; तरीही मी मात्र राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षातच राहणार आहोत. या पक्षातच थांबून संघर्ष करणार आहे,’’ असे एकनाथ खडसे यांच्या कन्या व शरद पवार यांच्या पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा ॲड.रोहिणी खडसे यांनी ‘सकाळ’शी बोलताना शनिवारी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार एकनाथ खडसे यांनी भाजपमध्ये घरवापसी करणार असल्याची घोषणा आज केली. यानंतर रोहिणी खडसे या काय भूमिका घेणार, असा प्रश्‍न उपस्थित झाला होता. त्यांनी सायंकाळी ‘एक्स’वर पोस्ट केली आहे. त्यात म्हटले आहे की, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष म्हणून मी काम करीत आहे. मी याच पक्षात आहे, भविष्यातही याच पक्षात राहणार आहे. या पोस्टसह त्यांनी तुतारी फुंकत असलेले छायाचित्रही जोडले आहे.

Rohini Khadse on Eknath Khadse joining bjp Sharad Pawar NCP jalgaon Marathi politics news
Virat Kohli RR vs RCB : हंगामातलं पहिलं... IPL मधलं आठवं शतक ठोकत विराट म्हणतो अती आक्रमकपणा...

‘मविआ’च्या उमेदवारांचा प्रचार करणार

रोहिणी खडसे यांच्याशी संपर्क साधला असता, त्या म्हणाल्या,‘‘मी शरद पवार यांच्या पक्षात राहण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षात राहून आपण संघर्ष करणार आहे. पक्षाच्या उमेदवारांसाठी तसेच महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी राज्यात झंझावती दौरे करणार आहे. शरद पवार यांची आज सकाळी भेट घेऊन पक्षात राहण्याची भूमिका स्पष्ट केली आहे.’’

Rohini Khadse on Eknath Khadse joining bjp Sharad Pawar NCP jalgaon Marathi politics news
Eknath Khadse : ''होय, मी माझ्या घरी जातोय...'', भाजपमध्ये निघालेले एकनाथ खडसे नेमकं काय म्हणाले?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com