Virat Kohli RR vs RCB : हंगामातलं पहिलं... IPL मधलं आठवं शतक ठोकत विराट म्हणतो अती आक्रमकपणा...

Virat Kohli 8th IPL Century
Virat Kohli 8th IPL Century esakal

Virat Kohli 8th Century In IPL : आरसीबीची रन मशिन विराट कोहलीने राजस्थान रॉयल्स विरूद्धच्या सामन्यात शतकी खेळी केली. त्याने 72 चेंडूत नाबाद 113 धावांची खेळी करत आरसीबीला 20 षटकात 3 बाद 183 धावांपर्यंत पोहचवण्यात सिंहाचा वाटा उचलला. त्याने 67 चेंडूत शतकी खेळी केली. त्याचे स्ट्राईक रेट हे 156.94 इतके आहे.

विराट कोहलीचे हे शतक आयपीएलच्या 17 व्या हंगामातील पहिले शतक ठरले तर वैयक्तिकरित्या त्याचे हे आयपीएलमधील आठवे शतक ठरले. विराट कोहली हा आयपीएल इतिहासात आठ शतके ठोकणारा पहिलाच फलंदाज ठरला आहे.

Virat Kohli 8th IPL Century
IPL 2024 RR vs RCB Live Score : विराट कोहलीची शतकी खेळी मात्र तरी आरसीबीची गाडी 183 धावांवर अडकली

विराट कोहलीने आपल्या दमदार शतकानंतर थोडी अजब प्रतिक्रिया दिली. विराट कोहली म्हणाला की, 'मी आज आधीच काही ठरवून आलो नव्हतो. मला माहिती होतं की मी अती आक्रमकपणा दाखवू शतक नाही. मी गोलंदाजांना कायम हा कधी आक्रमक फटका खेळणार याचा अंदाज बांधायला भाग पाडलं.'

अशा परिस्थितीत कसं खेळायचं याचा अनुभव आणि परिपक्वता यामुळे हे करता आलं. खेळपट्टीबाबत बोलायचं झालं तर जरी दव पडलं तरी खेळपट्टी खूप कोरडी आहे. त्यामुळे फलंदाजांना फलंदाजी करताना अडचणी येऊ शकतात. मी अश्विनविरूद्ध फटकेबाजी करू शकलो नाही. मी त्याचा चेंडू मिडविकेटला टोलवू शकलो नाही.'

Virat Kohli 8th IPL Century
Sourav Ganguly IPL 2024 : तुम बनते नहीं बनाये जाते हो.... सौरव गांगुली पांड्याविरूद्धच्या हूटिंगवर नेमकं काय म्हणाला?

विराट कोहली सोबतच आरसीबीचा कर्णधार फाफ ड्युप्लेसिसने देखील 33 चेंडूत 44 धावांची खेळी केली. या दोघांनी 125 धावांची सलामी दिली. मात्र विराट अन् ड्युप्लेसिस सोडला तर इतर फलंदाजांना फारशी चमक दाखवता आली नाही. मॅक्सवेल स्वस्तात माघारी गेला. तर पदार्पण करणाऱ्या चौहानला देखील चमक दाखवता आली नाही.

विराट कोहली शेवटच्या षटकापर्यंत खेळला अन् त्यानं 72 चेंडूत 113 धावांची नाबाद शतकी खेळी केली. मात्र तरी देखील आरसीबीला 200 धावांचा टप्पा पार करता आला नाही. त्यांची गाडी 20 षटकात 3 बाद 183 धावांपर्यंत मजली मारू शकली.

(IPL 2024 Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com