Rohit Patil Ajit Pawar Meeting Latest Update : काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे प्रतोद रोहित पाटील यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली आहे. त्यांच्या भेटीमुळे आता अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांनाही उधाण आलं आहे.