esakal | रोहित पवारांचा सिक्सर अडविण्यासाठी राणेंची फिल्डिंग
sakal

बोलून बातमी शोधा

रोहित पवारांचा सिक्सर अडविण्यासाठी राणेंची फिल्डिंग

- कोरोना विषाणुचा धोका होण्याच्या शक्यतेवर विधिमंडळात चर्चेचा फिवर वाढतोय.

रोहित पवारांचा सिक्सर अडविण्यासाठी राणेंची फिल्डिंग

sakal_logo
By
ज्ञानेश सावंत

मुंबई : राज्यात कोरोना विषाणुचा धोका होण्याच्या शक्यतेवर विधिमंडळात चर्चेचा फिवर वाढला असतानाच, राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी आरोग्य मंत्र्याकडे सहा प्रश्न विचारले; पण त्याआधी रोहित पवारांच्या सलग प्रश्नांचा षटकार रोखण्याचा भाजप आमदार नितेश राणेंचा डाव फसला. आपल्या लांबलचक प्रश्नांवरील राणे यांच्या आक्षेपाला 'अहो, राणेसाहेब महत्त्वाचा विषय आहे,' असल्याचा टोला पवारांनी लगावला आणि आपल्या प्रश्नांचा चेंडू आरोग्यमंत्री राजेश टोपेंच्या आसनापर्यंत पोचविला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

आमदार रोहित पवारानंतर आमदार राणे आपला प्रश्न घेऊन जागेत उभे राहिले आणि कोरोनावर 'हॅण्डवॉश' हा रामबाण उपाय असल्याचा मुद्दा मांडला. हा उपाय मांडून राणेंनी विधिमंडळाचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले. आमदार राणे बोलत असतानाच वेळ संपल्याची 'बेल' वाजली; तेव्हा, 'मी एकच प्रश्न विचारणार आहे, दहा नाही, असा टोमणा राणेंनी रोहित पवार यांच्या दिशेने फेकला.

कोरोना विषाणुचा प्रादुर्भावाची भीती, त्यावरचे उपाय, सरकार काय काळजी घेत आहे, नव्याने कोणती यंत्रणा उभारणार ? अशा मुद्यांवर विधिमंडळात चर्चा झाली. त्यावेळी रोहित पवार बोलायला उभे राहिले आणि प्रश्नांची सरबत्ती केली.

ते म्हणाले, चीनसह ५३ देशांत या आजाराचे रुग्ण आढळले आहेत. या पार्श्वभूमीवर आपल्याकडे 'एन ९५' मास्क आहेत का? भविष्यात मास्कचा साठा करू शकतो का, त्याशिवाय, पुणे नागपूर विमानतळांवर प्रवाशांची तपासणी करण्यासाठी थर्मल डिटेक्टरची सोय आहे का. तसेच, परदेशातून बोटीद्वारे येणाऱ्या प्रवाशांच्या तपासण्याचीही काळजी घेचली पाहिजे."

loading image