

Rohit Pawar
esakal
Shikhar Bank Case: महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील (एमएससीबी) २५ हजार कोटी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांना विशेष सत्र न्यायालयाने बुधवारी दोषमुक्त केले. यामुळे शिखर बँक प्रकरणाला पूर्णविराम मिळाला. रोहित पवार यांच्यासह प्राजक्त तनपुरे यांनाही दिलासा मिळाला आहे. त्यांचीही या प्रकरणी ईडी चौकशी सुरू होती. ती चौकशी थांबवण्यात आली आहे. तसंच त्यांची जप्त केलेली मालमत्ताही परत देण्याचे आदेश ईडी न्यायालयाने दिलाय. Shikhar Bank Case Court Decision Favors Pawar Tanpure