esakal | आदित्य ठाकरेंसाठी पवार मैदानात; चंद्रकांत पाटलांना म्हणाले....
sakal

बोलून बातमी शोधा

Rohit Pawar criticized Chandrakant Patil for attack on Aditya Thackeray

चंद्रकांत पाटील यांनी आदित्य ठाकरेंवर त्यांच्या कामावरून टीका केली होती, मात्र या टीकेला आदित्य यांनी प्रत्युत्तर न देता चक्क रोहित पवार यांनी दिले आहे. चंद्रकांत पाटलांच्या टीकेला तोंड देण्यासाठी आदित्य ठाकरेंसाठी चक्क रोहित पवार धावून आले आहेत.

आदित्य ठाकरेंसाठी पवार मैदानात; चंद्रकांत पाटलांना म्हणाले....

sakal_logo
By
वृत्तसंस्था

मुंबई : पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना त्यांच्या राजकीय अनुभवावरून भाजप नेहमीच लक्ष्य करत असते. याचाच प्रत्यय आदित्य ठाकरेंना पुन्हा एकदा आलाय. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आदित्य ठाकरेंवर त्यांच्या कामावरून टीका केली होती, मात्र या टीकेला आदित्य यांनी प्रत्युत्तर न देता चक्क रोहित पवार यांनी दिले आहे. चंद्रकांत पाटलांच्या टीकेला तोंड देण्यासाठी आदित्य ठाकरेंसाठी चक्क रोहित पवार धावून आले आहेत.

रश्मी ठाकरे संपादक झाल्या अन् पहिल्याच अग्रलेखात भाजपला...​

आदित्य ठाकरेंवर कामावरुन टीका केल्यानंतर रोहित पवारांनी चंद्रकांत पाटलांवर ट्विटरवरून निशाणा साधला आहे. 'चंद्रकांत पाटील तु्म्ही अनुभवापेक्षा आदित्य ठाकरे यांची काम बघा. एकमेकांची उणीदुणी काढण्यापेक्षा जबाबदार विरोधकाची भुमिका तुम्ही पार पाडू शकता' अशा शब्दात आदित्य यांची पाठराखण करत रोहित यांनी चंद्रकांत पाटलांना टोला लगावला आहे. 

अयोध्येतील मंदिर २०२४ पूर्वी पूर्ण होईल!

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या संपादकपदी रश्मी ठाकरे यांची निवड केल्यानंतर चंद्रकांत पाटील बोलत होते. शिवसेना व उद्धव ठाकरेंवर पाटलांनी कडाडून टीका केली आहे. उद्धव यांनी आपल्या मुलाला काहीही अनुभव नसताना कॅबिनेट मंत्रीपद दिले आहे, असे म्हणत चंद्रकांत पाटलांनी त्यांच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  

तसेच भाजप नेते आशिष शेलार यांनी राष्ट्रवादीवर केलेल्या टीकेवरही रोहित पवार यांनी उत्तर दिलंय.

loading image
go to top