esakal | 'अयोध्येतील मंदिर २०२४ पूर्वी पूर्ण होईल!'
sakal

बोलून बातमी शोधा

Ayodhya-Ram-Temple

ज्यांच्याविरुद्ध खटले सुरू आहेत आणि ज्यांनी कोणत्यातरी पक्षाच्या चिन्हावर निवडणुका लढविल्या आहेत, त्यांना ट्रस्टमध्ये घेण्यात आलेले नाही.

'अयोध्येतील मंदिर २०२४ पूर्वी पूर्ण होईल!'

sakal_logo
By
वृत्तसंस्था

इंदूर : अयोध्येतील राम मंदिराचे मूलभूत बांधकाम २०२४च्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी पूर्ण होईल, असा विश्‍वास विश्‍व हिंदू परिषदेचे कार्यकारी अध्यक्ष रामविलास वेदांनी यांनी रविवारी (ता.१) व्यक्त केला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

‘‘अयोध्येत ६७ एकर जागेवर उभारले जाणारे मंदिर हे जगातील सर्वांत मोठे मंदिर असेल व पर्यटकांसाठी ते मोठे आकर्षण ठरेल. भव्य मंदिर बांधण्यासाठी आजूबाजूची काही जागा राम मंदिर ट्रस्टला कदाचित घ्यावी लागेल,’’ असे वेदांनी म्हणाले.

- खुशखबर! गॅस सिलेंडरच्या दरात कपात; नवे दर...

‘‘ट्रस्टची स्थापना केंद्र सरकारने केल्यानंतर मंदिराच्या कामाला वेग आला आहे. संत-साधूंच्या इच्छेनुसार एक हजार एकशे अकरा फूट उंचीचे मंदिर उभारावे,’’ अशी आग्रही मागणीही वेदांती यांनी केली.

 - 'अयोध्येत पाय ठेवून देणार नाही'; महंतांची उद्धव ठाकरेंना धमकी!

राम मंदिराच्या चळवळीत असलेल्यांना ट्रस्टमध्ये स्थान देण्यात आले नसल्याबद्दल विचारले असता, वेदांती म्हणाले, ‘‘ज्यांच्याविरुद्ध खटले सुरू आहेत आणि ज्यांनी कोणत्यातरी पक्षाच्या चिन्हावर निवडणुका लढविल्या आहेत, त्यांना ट्रस्टमध्ये घेण्यात आलेले नाही.’’

loading image
go to top