Rohit Pawar On ED : ...जप्तीची नोटीस अजून आलेली नाही!; ईडीच्या कारवाईवर रोहित पवारांनी स्पष्ट केली भूमिका

Rohit Pawar On ED : ईडीच्या कारवाईनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी आज पत्रकार परिषद घेत त्यांची भूमिका स्पष्ट केली.
Rohit Pawar on ED attaches company assets baramati agro Ltd
Rohit Pawar on ED attaches company assets baramati agro Ltd

Rohit Pawar on ED attaches company assets baramati agro Ltd : बारामती अॅग्रो लि. या रोहित पवार डायरेक्टर असलेल्या कंपनीच्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड येथील सहकारी साखर कारखान्यावर ईडीकडून जप्तीची कारवाई करण्यात आली. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी आज पत्रकार परिषद घेत त्यांची भूमिका स्पष्ट केली.

रोहित पवार म्हणाले की, कन्नड येथील कारखान्यावर प्रतिकात्मक जप्तीची कारवाई ईडीने केली आहे. अजून पर्यंत जप्तीची नोटीस आमच्या पर्यंत पोहचली नाही. पण ईडीच्या ट्विटर अकाउंटवर प्रेस नोट पाहिल्यावर आम्हाला ही माहिती कळाली. जप्ती म्हणजे पूर्णपणे जप्ती नसते, ती प्रतिकात्मक जप्ती असते. १८० दिवस दिले जातात. त्यामध्ये बरीच मोठी प्रक्रिया असते, त्याचा वापर करून आपली बाजू मांडायची असते, ती प्रक्रिया पुढे चालू असेल असेही रोहित पवार म्हणाले. सर्व शेतकरी, कर्मचारी, बँक आणि कंपनीवर अवलंबून आहेत त्यांना मी आश्वासित करतो की अजिबात काळजी करण्याची गरज नाही असेही रोहित पवार म्हणाले.

Rohit Pawar on ED attaches company assets baramati agro Ltd
Nita Ambani : 'मिस वर्ल्ड २०२४' सोहळ्यात नीता अंबानी यांचा मोठा गौरव, 'ह्युमॅनिटेरियन' पुरस्कारानं सन्मानित

बारामती अॅग्रे लि. ही कंपनी १९८८ रोजी आप्पासाहेब पवार म्हणजे माझ्या आजोबांनी सुरू केली. २००० च्या आसपास माझ्या वडिलांनी कंपनीत लक्ष द्यायला सुरूवात केली. २००७ पासून मी या कंपनीकडे लक्ष देण्यास सुरूवात केली. या कंपनीत साडे आठ हजार कामगार आणि कर्मचारी सध्या काम करतात. कुटुंबियांची संख्या घेतली तर ५० हजारांच्या आसपास लोक या कंपनीवर अवलंबून आहेत. कॉन्ट्रक्ट वर्कर आणि इतर संबंधीत कर्मचारी घेतले तर हा आकडा तीन ते साडेतीन लाखांच्या आसपास जातो. या कंपनीकडे राजकीय दृष्टीकोनातून बघत असाल तर मला त्यांना सांगायचंय की तुम्ही साडेतीन लाख लोकांच्या कुटुंबाशी खेळ करू शकता असेही रोहित पवार यावेळी म्हणाले.

८ मार्च २०२४ ला नोटीस आली म्हणजे प्रेस नोटच्या माध्यमातून आम्हाला कळालं. पण ही प्रेस नोटच चूकीची आहे असे आमचे म्हणणे आहे. यामध्ये माझ्या आधी जरांडेश्वर कारखान्यासाठी आलेली प्रेस नोट ही बारामती अॅग्रो या आमच्या कारखान्याला आलेली प्रेस नोट मध्ये कट कॉपी पेस्ट केल्याचं दिसून आलं आहे, असेही रोहित पवार म्हणाले. कट कॉपी पेस्ट करताना मोठ्या चूका झाल्या आहेत. त्यात ,सांगितलं की, एमएससीबीने कन्नड एसएसकेचं ऑक्शन केलं आणि त्याची लो रिझर्व्ह प्राइस ठेवली, प्राइस किती ठेवायची हे तेथे असणारे बँकेचे लोकं ठरवतात. आमचं त्याच्याशी काही देणं घेणं नाही असेही रोहित पवार म्हणाले.

Rohit Pawar on ED attaches company assets baramati agro Ltd
Dharavi Umesh Keelu Success Story : पेंटर वडिलांना अर्धांगवायू...10 बाय 5 फुटाचं घरं..धारावीचा 'उमेश' कसा बनला आर्मी ऑफिसर?

तसेच या प्रेस नोटमध्ये सांगितलं की, एक हायस्ट बीडर होता जो टेक्निकली डिसक्वालीफाय झाला, आम्हाला कसं कळणार की तो टेक्निकली डिसक्वालीफाय झाला? असाही सवाल रोहित पवारांनी यावेळी उपस्थित केला. कंडिशनल बिड त्यांनी टेंडरमध्ये नसताना भरलं होतं म्हणून तो कँसल झाला. त्याला मी काय करणार. यामध्ये टेक्निकल मध्येच तो डिसक्वालिफाय झाला होता, आणि त्यावर निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार बँकेला होता, असेही रोहित पवार म्हणाले.

त्यानंतर दुसरा कोणीतरी उद्योजक आमच्या परिचयाचा होता असे सांगण्यात आलं , तर असं काहीही नाही. त्याने आमच्याकडे काही कामे केली होती. त्याच्याकडे वेगळं लायसेन्स आहे. आम्ही इडीला याबद्दल माहिती ईडीला दिले आहेत. त्याच्याशी आमचे व्यवहारीक संबंध नाहीत हे आम्ही ईडीला सांगितलं होतं असेही रोहित पवार म्हणाले. पुढे बोलताना या प्रेसनोटच्या विरोधात आम्ही कोर्टात जाणार असल्याचेही आमदार रोहित पवार यावेळी म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com