Nita Ambani : 'मिस वर्ल्ड २०२४' सोहळ्यात नीता अंबानी यांचा मोठा गौरव, 'ह्युमॅनिटेरियन' पुरस्कारानं सन्मानित

मुंबईतील अंबानी (Nita Ambani Latest News) वर्ल्ड सेंटरमध्ये या वर्षीचा मिस वर्ल्डचा सोहळा पार पडला.
Nita Ambani News
Nita Ambani Newsesakal

Humanitarian Award 2024 Nita Ambani : झेक रिपब्लिकच्या ख्रिस्तिना पिजकोवानं यावेळी ७१ व्या मिस वर्ल्ड विजेतेपदाचा मुकूट आपल्या नावावर केला आहे. या सगळ्यात भारताच्या प्रसिद्ध उद्योजिका नीता अंबानी यांच्या नावाची वेगळ्या कारणामुळे चर्चा होत आहे. अंबानी फाउंडेशनच्या प्रमुख म्हणूनही नीता अंबानी यांचे नाव घेता येईल.

२८ वर्षानंतर या सोहळ्याचे आयोजन अंबानी यांच्या मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये करण्यात आले होते. भारताला प्रेझेंट करणाऱ्या सिनी शेट्टीला आठव्या स्थानावर समाधान मानावे लागले होते. त्यानंतर ती स्पर्धेतून बाहेर पडली. यावेळी २००० साली मिस वर्ल्डचा खिताब आपल्या नावावर करणाऱ्या प्रियंका चोप्रानं या इव्हेंटसाठी एक वेगळा मेसेज पाठवला होता. या व्हिडिओमध्ये तिनं मिस वर्ल्ड ऑर्गनायझेशनच्या अध्यक्ष आणि सीइओ ज्युलिया मॉर्ले आणि नीता अंबानी यांचे कौतुक केले आहे.

७१ व्या मिस वर्ल्ड २०२४ च्या स्पर्धेत नीता अंबानी यांना नुकतेच ह्युमॅनिटेरियन पुरस्कारानं गौरविण्यात आले. त्यानिमित्तानं प्रियंकानं त्यांचे कौतुक केल्याचे दिसून आले आहे.

७१ व्या मिस वर्ल्ड २०२४ च्या सोहळ्यामध्ये नीता अंबानी यांना ह्युमॅनिटेरियन पुरस्कारानं गौरविण्यात आले आहे. याप्रसंगी प्रियंकानं त्याबद्दल नीता अंबानी यांच्याविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. प्रियंका म्हणाली की, माझ्यासाठी उद्देश हा खूपच मोठा शब्द आहे. मी माझी आई डॉ.मधू चोप्रा आणि वडील यांनी केवळ त्यांच्या कर्तव्याचे पालन करताना पाहिले नाही तर त्यांनी गरजवंतांना जे सहकार्य केले ते कधीही न विसरता येणार नाही.

Nita Ambani News
Nita Ambani and Isha Dance: 'घर मोरे परदेसिया' गाण्यावर नीता अंबानींचा लेकीसोबत डान्स, व्हिडीओ व्हायरल

प्रियंकानं केलं नीता अंबानींचं कौतुक....

या बरोबरच प्रियंका चोप्रानं नीता अंबानी यांची खूप स्तुती केल्याचे यावेळी दिसून आले. प्रियंकानं म्हटले आहे की, मला गेल्या काही वर्षांपासून नीता अंबानी यांना जाणून घेण्याची संधी मिळाली आहे. मी त्यांच्यासोबत कामही केले आहे.त्यामुळे मला त्यांचे व्यक्तिमत्व माहिती आहे.

नीता अंबानी यांचे परफेक्शन हे नेहमीच प्रेरणादायी राहिले आहे. मी गेल्या काही वर्षांपासून वेगवेगळ्या निमित्तानं त्यांना भेटले आहे. त्यामुळे मला त्यांचा प्रभाव माहिती आहे. या नव्या पुरस्कारासाठी देखील त्यांचे खूप सारे कौतुक.त्या भारतीय कलेच्या समर्थक आणि संवर्धनकर्त्या आहेत. अशा शब्दांत प्रियंकानं तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com