Rohit Pawar : ...तर, वेदांता पुन्हा येऊ शकतो; रोहित पवारांच्या विधानानं आशा उंचावल्या

वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्याने राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे.
Rohit Pawar
Rohit Pawar Sakal

Rohit Pawar On Vedanta Controversy : वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्याने राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. यावरून सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर आरोपप्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहे. हा प्रकल्प पुन्हा राज्यात कसा आणला जाईल यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जात असतानाच, हा प्रकल्प पुन्हा राज्यात येऊ शकतो असे विधान आमदार रोहित पवार यांनी केले आहे. त्यांच्या या विधानानं राज्याच्या आशा पुन्हा उंचावल्या आहेत.

Rohit Pawar
Eknath Shinde: शरद पवारांच्या चौकशीच्या मागणीवर मुख्यमंत्री शिंदे काय म्हणाले?

लाखो लोकांना रोजगार मिळून देणारा वेदांतासारखा प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जाणे ही चांगली गोष्ट नसल्याचे त्यांनी म्हटले असून, अद्याप वेदांताला गुजरातमध्ये प्रकल्पासाठी कोणतीही जमीन मिळालेली नाही. तसेच कोणतीही जमीन आवडलेली नाही. मिविआ काळात वेदांताला तळेगाव येथे जागा उपलब्ध करून देण्यात आली होती. एवढेच नव्हे तर, त्यांना ती जागा आवडली देखील होती. यासाठी संबंधित कंपनीला अनेक सोयी सुविधादेखील उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. त्यानंतरही हा प्रकल्प गुजरातला गेला.

Rohit Pawar
मुंबई : अखेर ठाकरे गट न्यायालयात शिंदेगट मंत्र्यांचा राज्यात दौरा

मात्र, जरी हा प्रकल्प गुजरातला गेलेला असला तरी, अद्यापपर्यंत वेदांताला गुजरातमध्ये कोणतीही जमीन पसंतीस पडलेली नाही. त्यामुळे हा प्रकल्प पुन्हा एकदा राज्यात येऊ शकतो, असा विश्वास रोहित पवार यांनी व्यक्त केला आहे. त्यासाठी महाराष्ट्रातील सर्व नेत्यांनी प्रयत्न केले पाहिजे असेही ते म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com