

Ajit Pawar Plane crash
esakal
Rohit Pawar: अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर राज्यभरातून घातपाताबद्दलच्या शंका उपस्थित केल्या जात आहेत. आमदार रोहित पवार यांनीही तशीच शंका उपस्थित करत अनेक मुद्द्यांना स्पर्श केला. तपास यंत्रणांकडून त्या प्रश्नांची उत्तरं मिळणं अपेक्षित असल्याचं रोहित पवार म्हणाले. विमानांचं मेंटेनन्स करणाऱ्या भारतात दोनच कंपन्या आहेत. त्यातली एक कंपनी प्रफुल्ल पटेलांची असल्याचं आमदार रोहित म्हणाले. मात्र व्हीएसआरचीच कंपनी विमानांची देखभाल बघत होती.