
'सत्तेच्या लालसेपोटी...', रोहित पवारांचा फडणवीसांवर पलटवार
मुंबई : राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी १४ ट्विट करत थेट शरद पवारांवर (Sharad Pawar) निशाणा साधला होता. बाबासाहेब आंबेडकरांबाबतच्या भूमिकांपासून थेट कलम ३७० पर्यंतच्या मुद्द्यांवरून फडणवीसांनी टीका केली होती. त्यानतंर आमदार रोहित पवारांनी ट्विट करून फडणवीसांना प्रत्युत्तर दिले आहे. राज्यात हातातून सत्ता गेल्याने विरोधकांची प्रमाणापेक्षा अधिक तडफड होताना दिसतेय, असं रोहित पवार (Rohit Pawar) म्हणाले.
हेही वाचा: Video: हे नवीन प्रकारचं राजकारण देशात सुरु झालं आहे- रोहित पवार
राज्यात हातातून सत्ता गेल्याने विरोधकांची प्रमाणापेक्षा अधिक तडफड होताना दिसतेय. म्हणून संदर्भ लपवून ठेवत अर्धवट माहिती देऊन लोकांचा बुद्धिभेद करण्याचा व बेछूट आरोप करून ६ दशकं संसदीय राजकारणाच्या माध्यमातून लोकसेवा करणाऱ्या पवार साहेबांना बदनाम करण्याचा विरोधकांचा प्रयत्न आहे. सत्तेच्या लालसेपायी पवार साहेबांना बदनाम करण्यासाठी सामाजिक तणाव निर्माण करून नागरिकांनी कष्टाने उभ्या केलेल्या घरांना आग लावण्यास आणि माणसांचा जीव घेण्यासही अशा प्रवृत्तीचे लोक मागंपुढं पाहणार नाहीत. पण विरोधकांकडून इतर राज्यांमध्ये वापरल्या जाणाऱ्या या अमानवी प्रकाराला छत्रपती शिवराय आणि शाहू-फुले-आंबेडकर यांचा पुरोगामी महाराष्ट्र कधीही थारा देणार नाही! शिवाय राज्यातील माँ जिजाऊ, सावित्रीमाई, पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या लेकीही तसं होऊ देणार नाहीत, असं रोहित पवार म्हणाले.
फडणवीस नेमकं काय म्हणाले होते? -
द काश्मीर फाइल्सवर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांची जी विधाने ऐकत आहोत यात आजिबात आश्चर्य नाही. किंबहुना, ते राष्ट्रवादीच्या तुष्टीकरण धोरण आणि जातीय आधारावर राजकारणासह समाजाचे ध्रुवीकरण करतात, असा आरोप फडणवीसांनी केला होता. तसेच नवाब मलिकांवर कारवाई झाल्यानंतर शरद पवार काय म्हणाले होते? याची आठवण देखील फडणवीसांनी करून दिली होती. तसेच मलिक मुस्लीम असल्यामुळे त्यांचं नाव दाऊदसोबत जोडलं आहे, असं पवारांनी म्हटल्याचं फडणवीसांनी ट्विटमधून सांगितलं होतं. अशाचप्रकारे त्यांनी एकूण १४ ट्विट करून पवारांवर टीका केली होती.
Web Title: Rohit Pawar Replied Devendra Fadnavis Allegations Over Sharad Pawar
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..