Rohit Pawar:मी राजकारणात येऊन चुक केली का… रोहित पवारांना पडला प्रश्न, मंत्र्यांच्या अमिषाबद्दल केला खुलासा

रोहित पवारांनी बोलताना सरकारमधील काही मंत्र्यांवर आरोप केले आहे. काम करण्याच्या बदल्यात मंत्र्यांची बाजू घेण्यास सांगतात.
rohit pawar
rohit pawarsakal media

Yuva Sangarsh Yatra: दसऱ्याच्या दिवशी रोहित पवार यांच्याकडून 'युवासंघर्ष' यात्रेची सुरुवात करण्यात आली. यावेळी तरुणांनी रोहित पवारांचं जंगी स्वागत करत, त्यांच्यावर पुष्पवर्षाव केला. या युवासंघर्ष यात्रेची सुरुवात करण्यासाठी आशीर्वाद सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी रोहित पवारांनी बोलताना सरकारमधील काही मंत्र्यांवर आरोप केले आहे. काम करण्याच्या बदल्यात मंत्री त्यांची बाजू घेण्यास सांगतात, असं ते म्हणाले.

याबद्दल सांगताना रोहित पवार म्हणाले की, "कामासाठी कोणत्याही मंत्र्याला भेटतो तेव्हा ते म्हणतात आमची बाजू घे काम करतो."यावेळी रोहित पवारांनी स्पर्धा परीक्षांच्या अनियमिततेबद्दलही भाष्य केलं.

परीक्षा वेळेवर होत नसल्याने, मुलांवर अन्याय होत आहे. याबद्दल बोलताना ते म्हणाले की, "युवकांच्या हातात आज पदवी आहे पण, नोकरी नाही. हा अन्याय आहे. स्पर्धा परीक्षांसाठी युवकांची तयारी झाली आहे, पण परीक्षा होत नाहीत. हा अन्याय आहे. अशा अन्यायाविरोधात आमची ही संघर्ष यात्रा आहे."

महाराष्ट्र शासनाने कंत्राटी भरतीचा जीआर मागे घेतला. यावर रोहित पवार म्हणाले की, "कंत्राटी भरतीचा जीआर मागे घेतला. हे युवा संघर्ष यात्रेचं पहीलं यश. हा जीआर मागे घेतल्यानंतर संघर्ष यात्रा काढणार नाही. असा सरकारचा समज होता. पण माझी संघर्ष यात्रा थांबणार नाही."(Latest Marathi News)

rohit pawar
Dasara Melava: शिंदेंच्या दसरा मेळाव्यात जळगाव स्पेशल शेवभाजी, खुद्द मंत्री महोदयांचा स्वयंपाकाला हातभार

रोहित पवार म्हणाले की, " आधी विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांमध्ये वैयक्तिक वाद नव्हता. राजकीय नेते एकमेकांची कामं करायचे. मात्र, २०१४ नंतर वातावरण बदलले आहे. आता वैयक्तिक वितुष्ट आलय. मागील सहा वर्षात सुडाच्या भावनेतून राजकारण होत आहे. त्यामुळं मी राजकारणात येऊन चुक केली का ? असा प्रश्न मला पडतो." 

rohit pawar
Hamoon Cyclone : हामून चक्रीवादळाची तीव्रता वाढली, सात राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com