esakal | गंगा नदी बनेल रोगाचे उगमस्थान! रोहित पवारांनी ट्विटद्वारे व्यक्त केली भीती
sakal

बोलून बातमी शोधा

Rohit Pawar

गंगा नदी बनेल रोगाचे उगमस्थान! रोहित पवारांना भीती

sakal_logo
By
अशोक निंबाळकर

अहमदनगर ः गंगा ही केवळ नदी नाही तर ती भारतीयांची जीवनरेखा आहे. गंगेचे धार्मिक, सांस्कृतिक महत्त्व आहे. गंगेच्या पाण्याने आंघोळ केली तर साताजन्माचे पाप धुतले जाते, अशी समाजमान्यता आहे. हिंदू धार्मिक ग्रंथातही तसे उल्लेख सापडतात. परंतु ही गंगा नदीच आता रोगाचे केंद्र बनण्याची भीती आहे. कर्जत-जामखेडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट करून तशी भीती व्यक्त केली आहे.

समाज माध्यमात मत मांडताना त्यांनी केंद्र सरकार आणि उत्तर प्रदेश सरकारच्या कार्यपद्धतीवरही बोट ठेवले आहे. कोविड कहर सुरू असताना अनेकांना प्राणास मुकावे लागले. अंत्यविधी करण्यासही कोणी धजावत नव्हते, अशा स्थितीत अनेक मृतदेह गंगा नदीत फेकण्यात आले. काही दिवसांपूर्वी कुंभमेळा भरला होता. या मेळ्यातून अनेक आखाड्याच्या महंतांनी माघार घेतली होती.(Rohit Pawar says that the river Ganga can spread the disease)

हेही वाचा: आई-वडिलांना सांभाळत नसाल तर पडेल महागात, थेट पगारालाच कात्री

कोविडमुळे बाधित झालेल्यांचे मृतदेह गंगा नदीच्या पाण्यात टाकले जात असल्याचे माध्यमांनी समोर आणले होते. मृतदेहांचा खच साचल्याची भयावह चित्र होते. त्यामुळे पर्यावरणाची हानी होत आहे. सोबतच रोगराई पसरण्याची शक्यता आहे, असे पवार ट्विटमध्ये लिहितात.

गंगा नदी धार्मिकदृष्ट्या पूजनीय आहेच पण कृषी व पर्यावरणाच्या दृष्टीनेही अत्यंत महत्वाची आहे. परंतु सरकारच्या उदासीनतेमुळं ही पवित्र नदी दुर्लक्षित होत आहे. हे असंच चालू राहिलं तर येणाऱ्या पिढ्यांना गंगा नदी कुठल्या स्वरूपात दिसेल, हे सांगता येणार नाही.

लॉकडाउनमध्ये सर्वत्र प्रदूषण घटत असताना गंगा नदीची अशी विपरीत अवस्था असेल तर हे चिंताजनक आहे. याबाबत केंद्राने अभ्यास सुरु केल्याचं समजतंय. त्याला अधिक वेग देऊन गंगेकडं राजकारणापलीकडं पाहण्याची आणि तिचं पावित्र्य कायम राखण्यासाठी युद्धपातळीवर सर्वोतोपरी प्रयत्न करण्याची गरज आहे. स्थानिक सरकारला कोविडची स्थिती हाताळता न आल्याने अशी स्थिती उदभवली आहे, असा उल्लेखही ते करतात.

जामखेडच्या विंचरणा नंदीचे पालटले रूप

रोहित पवार यांनी आपल्या कर्जत-जामखेड या मतदारसंघात पर्यावरण संरक्षणासाठी काम केले आहे. कर्जत नगर पालिका आणि मिरजगाव ग्रामपंचायतीस माझी वसुंधरा स्पर्धेत द्वितीय क्रमांकाचे बक्षीस मिळाले आहे. नदीच्या स्वच्छतेचेही त्यांनी काम केले आहे. गंगारगंगा बनलेल्या जामखेडच्या विंचरणा नदीचे रूप त्यांनी पालटले आहे. कर्जत-जामखेड एकात्मिक संस्थेच्या माध्यमातून त्यांनी हे काम केले आहे. पदरमोड करीत त्यांनी अनेक कामे केली आहेत. भगवान शंकराची मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करून धार्मिक अधिष्ठानही प्राप्त करून दिले आहे. (Rohit Pawar says that the river Ganga can spread the disease)