मुख्यमंत्री म्हणून कोण पाहायला आवडेल; सुप्रिया सुळे की अजित पवार? यावर रोहित पवार म्हणाले...

सकाळ वृत्तसेवा
Friday, 17 January 2020

'संवाद तरुणाई'शी या कार्यक्रमात महाराष्ट्रातील सर्व तरुण आमदार सहभागी झाले होते.

पुणे : नगर जिल्ह्यातील संगमनेर येथे मेधा महोत्सव 2020 'संवाद तरुणाई'शी हा कार्यक्रम चांगलाच रंगला. त्याच कारणही तसंच होतं. आमदार रोहित पवार यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून तुम्हाला कोणाला पाहायला आवडेल, सुप्रिया सुळे की अजित पवार असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर रोहित पवार म्हणाले, पवारसाहेब ज्याला मुख्यमंत्री करतील तो मुख्यमंत्री म्हणून पाहायला आवडेल.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

'संवाद तरुणाई'शी या कार्यक्रमात महाराष्ट्रातील सर्व तरुण आमदार सहभागी झाले होते. राजवर्धन थोरात यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, आमदार धीरज देशमुख, आमदार रोहित पवार, आमदार आदिती तटकरे, आमदार ऋतूराज पाटील, आमदार झिशान सिद्धिकी तसेच सत्यजित तांबे आदी उपस्थित होते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

या कार्यक्रमात अवधूत गुप्ते यांनी या आमदारांशी संवाद साधला. यावेळी झालेल्या रॅपिड फायर राऊंड चांगलाच रंगला. यामध्ये रोहित पवार व ऋतूराज पाटील यांना विचारलेल्या प्रश्‍नांमुळे कार्यक्रमात चांगलीच रंगत आली. यावेळी ऋतूराज पाटील यांना एक प्रश्‍न विचारण्यात आले. त्यांना तुम्हाला या दोघांपैकी सर्वात जास्त मुरब्बी कोण वाटते असा प्रश्‍न विचारण्यात आला.

त्यामध्ये बंटी पाटील की हसन मुश्रीफ यावेळी ऋतूराज पाटील यांनी काकांची बाजू घेत आपल्याला बंटी काकाच आवडत असल्याचे सांगितले. तसेच रोहित पवार यांना आपल्याला 
मुख्यमंत्री म्हणून या दोघांपैकी कोणाला पाहायला आवडेल असा प्रश्‍न विचारला. यामध्ये सुप्रिया सुळे व अजित पवार असे दोन ऑप्शन त्यांना देण्यात आले, या प्रश्‍नाचे रोहित पवार यांनी अगदी मुरब्बी राजकारणी असल्यासारखे दिले.

या कार्यक्रमास चांगलीच रंगत भरत गेली. शेवटी रॅपिड फायर राऊंडने कार्यक्रमाची सांगता झाली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rohit Pawar talked about Politics