Rohit Pawar: रोहित पवार करणार राम शिंदेंचा शाल देऊन सत्कार, MIDC ठरतंय कारण

MIDC वरुन राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार आणि भाजप आमदार राम शिंदे यांच्यातील राजकारण तापलं
Rohit Pawar
Rohit PawarEsakal

कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार त्यांच्या मतदारसंघामध्ये एमआयडीसी उभी रहावी यासाठी प्रंचड आग्रही आहेत. सध्या सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनात एमआयडीसीसाठी रोहित पवार यांनी आंदोलनही केलं होतं. भर पावसात ते आंदोलनाला बसले होते. MIDC साठी त्यांनी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याबरोबर चर्चा सुद्धा केली आहे. MIDC आल्यास मतदारसंघात रोजगार निर्मिती होईल, असा रोहित पवार यांना विश्वास आहे. म्हणून ते MIDC साठी आग्रही आहेत. तर यावरुन आमदार राम शिंदे यांच्या वाकयुद्ध रंगलं आहे.

तर आज रोहित पवार बोलताना म्हणाले की, 'मी शाल घेऊन आलोय. मी राम शिंदे यांचा सत्कार करणार आहे. कारण मी तरूणांना काम मिळावे म्हणून मनापासून प्रयत्न करत आहे. तर आणि राम शिंदे MIDC येऊ नये म्हणून प्रयत्न करत आहेत'. सध्या याच MIDC वरुन राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार आणि भाजप आमदार राम शिंदे यांच्यातील राजकारण तापलं आहे.

Rohit Pawar
Nagar : ‘‘त्या’ जमीन खरेदीची चौकशी व्हावी’; आमदार रोहित पवारांची मागणी...

तर कर्जत-जामखेडचे MIDC वरुन ग्रामस्थ देखील चांगलेच आक्रमक झाले होते. आता ज्या भागात एमआयडीसी होणार आहे, त्या पाटेगावच्या ग्रामस्थांनी एमआयडीसीला विरोध केला होता.

त्यावर बोलताना रोहित पवार म्हणाले की, 'ग्रामसभेचा ठराव वाचला तर गावकऱ्यांनी काही भिती व्यक्त केली आहे. १०६ लोक ग्रामसभेला होते. त्यातल्या एकाने सांगितले की, केमिकल इंडस्ट्री येणार पण अस नाही. त्यातील एक जण म्हणाला आपली घर घेणार शेती घेणार तर असं काही नाही. उच्चशिक्षित तसेच जे शिकले नाहीत त्यांना सुद्धा काम मिळेल. अनेक माध्यमातून कामे मिळतील. त्यांचा तिकडे विरोध संपला. अधिकारी येतात आणि ग्रामस्थांशी चर्चा करतात हे त्यांना समजले. पण शिंदे प्रोफेसर असून त्यांना ते समजत नाही असा खोचक टोला रोहित पवारांनी लगावला आहे.

Rohit Pawar
Bomb Threat for Pune Airport : पुणे विमानतळ बॉम्बनं उडवण्याच्या धमकीनं खळबळ! 72 वर्षीय महिलेवर गुन्हा दाखल

राम शिंदे यांनी वेळकाढूपणा केला

राम शिंदे यांनी एक गुऱ्हाळ सुद्धा चालवली नाही त्यामुळे त्यांना काही माहित नाही. ते मंत्री असताना त्यांना रोड आणता आले नाहीत. आता रोड झाले म्हणून कंपन्या येतील. राम शिंदे वेळकाढूपणा करत आहेत. तर शेतकरी म्हणतात जमिन आमच्या आहेत आणि सभागृहामध्ये म्हणता जमिनी नीरव मोदी आणि शाह यांच्या आहेत. लोकांची दिशाभूल करत आहेत. हवं तर तुम्ही श्रेय घ्या पण MIDC येउद्या, असंही रोहित पवार यावेळी म्हणाले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com