Rohit Pawar: 'तुम्हाला आपली निष्ठा गहाण....', पवारांची साथ सोडणाऱ्या नेत्यांना रोहित पवारांचा सवाल

पवारांची साथ सोडणाऱ्या नेत्यांना रोहित पवारांचा खोचक सवाल
Rohit Pawar
Rohit PawarEsakal

राज्याच्या राजकारणात सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमधल्याच दोन गटांमध्ये चालू असलेल्या कलगीतुऱ्याची जोरदार चर्चा सुरू आहे. अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली एक गट सरकारमध्ये सहभागी झाला असून एक गट अजूनही शरद पवार यांच्यासोबत आहे. किती आमदारांचा पाठिंबा आपल्याला आहे या पार्श्वभूमीवर काल मुंबईत दोन्ही गटांच्या बैठकांचं आयोजन करण्यात आलं होतं.  (Marathi Tajya Batmya)

यात अजित पवार गटाच्या बैठकीत नेतेमंडळींनी शरद पवारांना आणि त्यांच्या काही निर्णयांना लक्ष्य करताना आपापल्या भूमिका मांडल्या. तर अजित पवारांना ज्या नेत्यांनी पाठिंबा दिला त्या नेत्यांनी शरद पवारांवर आरोप करत काम करण्याची संधी दिली नाही असं म्हंटलं. तर या त्यांच्या आरोपवर उत्तर देण्यासाठी त्यांच्या एकंदरीत कामाचा आणि दिलेल्या जबाबदारींचा आढावा राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी मांडला आहे.(Latest Marathi News)

Rohit Pawar
Raj Thackrey on Alliance: 'आम्ही युतीसाठी प्रस्ताव...', ठाकरे गट-मनसे युतीबाबत राज ठाकरेंचं मोठं वक्तव्य

रोहित पवार यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंट वरती त्याची माहिती पोस्ट केली आहे. रोहित पवार यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंट वरती 'अजून काय पाहिजे', अशी सिरिज चालवली आहे. यामध्ये त्यांनी आतापर्यंत शरद पवारांच्या जवळचे आणि सर्वात महत्वाच्या जबाबदाऱ्या दिलेल्या नेत्यांचे पोस्टर शेअर केले आहेत. (Marathi Tajya Batmya)

यामध्ये प्रफुल्ल पटेल, दिलीप वळसे-पाटील यांना दिलेल्या सर्व जबाबदाऱ्यांचा पाढा रोहित पवार यांनी लिहला आहे. तर दिलीप वळसे पाटील यांच्याबद्दल रोहित पवार म्हणतात की, 'मा. वळसे-पाटील साहेब आदरणीय पवार साहेबांनी स्वतःच्या मुलाप्रमाणे जपलेला नेता म्हणून तुम्हाला महाराष्ट्र ओळखतो. तुमच्यावर तर साहेबांचा सर्वाधिक विश्वास होता. पण अचानक असं काय संकट आलं की तुम्हाला आपली निष्ठा गहाण ठेवावी लागली. आपल्या विचारधारेला मूठमाती द्यावी लागली, हे महाराष्ट्राला जाणून घ्यायचंय. केवळ सत्तेसाठी अशा प्रकारची बंडखोरी आपल्या सारख्या जेष्ठ नेत्याकडून अपेक्षित नव्हती.'(Latest Marathi News)

असो! प्रत्येक संकटावर मात करण्याची ताकद आमच्या #सह्याद्रीत आहे. सह्याद्रीच्या बाजूने संपूर्ण महाराष्ट्र उभा असून हा सह्याद्री नव्या जोमाने आणि नव्या ताकदीने उभा राहीलच, परंतु वळसे-पाटील साहेब तुम्ही स्वतःला तुमच्या या कृतीबद्दल माफ करू शकणार का? (Marathi Tajya Batmya)

Rohit Pawar
MNS-Thackrey Alliance: एका गाडीतून प्रवास आणि पुन्हा ठाकरे बंधु एकत्र येण्याची चर्चा! मनसेचा ठाकरे गटाकडे युतीचा प्रस्ताव?

तर प्रफुल पटेल यांच्याबद्दल रोहित पवार म्हणतात की, 'प्रफुल्ल पटेल साहेब मा. पवार साहेबांच्या कृपेने तुम्हाला लोकांमध्ये जायची गरज फार कमी वेळा पडली... जमिनीपेक्षा आपलं 'विमान' हवेतच जास्त असायचं आणि बहुतेक वेळा केवळ फॉर्मवर सही करण्यापुरतंच आपलं काम असायचं.. म्हणूनच तर तुम्हाला मतांचं मूल्य आणि साहेबांचं पितृतुल्य प्रेम कधी कळलंच नाही...' आता यावर प्रफुल पटेल आणि दिलीप वळसे पाटील काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. (Marathi Tajya Batmya)

Rohit Pawar
Shivsena MLA : एकनाथ शिंदेंची डोकेदुखी वाढली; 10 आमदार ठाकरे गटाच्या संपर्कात?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com