

solapur city
sakal
तात्या लांडगे
सोलापूर : सोलापूर शहर पोलिसांच्या बॉम्बशोधक व नाशक पथकात ‘रॉक्सी’ दाखल झाली आहे. ते बेल्जियम गेलोनाईज शेफर्ड आहे. अंदाजे ५० हजार रुपयास घेतलेली ती चार महिन्यांची मादी आहे. सहा महिन्यानंतर तिला पुण्यात बॉम्बशोधण्यासंदर्भातील सहा महिने प्रशिक्षण दिले जाणार आहे. सोलापूर शहर पोलिसांनी शनिवारी (ता. १) ते श्वान पुण्यातून आणले आहे. पोलिस आयुक्त एम. राजकुमार यांनी सोमवारी (ता. ३) श्वानाचे ‘रॉक्सी’ असे नामकरण केले.
सोलापूर शहरातील दैनंदिन गर्दीची ठिकाणे, मर्मस्थळे, बेवारस बॅगा, वाहनांची तपासणी, व्हीव्हीआयपींचे दौरे, बंदोबस्त, नागपूर येथील हिवाळी अधिवेशन, पंढरपूर आषाढी वारीचा बंदोबस्त, तुळजापूर येथील नवरात्रोत्सवातील बंदोबस्त, भीमा- कोरेगाव बंदोबस्त, नंदुरबार, नांदेड यातील व्हीव्हीआयपी बंदोबस्त अशा ठिकाणी या श्वानाची पोलिसांना मोठी मदत होते. नऊ वर्षांपर्यंत ते श्वान पोलिस दलात सेवेसाठी असते.
‘माया’ सेवेतून निवृत्त होण्यासाठी १५ दिवस शिल्लक असताना आजारी पडून मयत झाली. त्यानंतर सोलापूर शहर पोलिसांनी नवे श्वान आणले आहे. नव्या ‘रॉक्सी’चे दैनंदिन काम सांभाळण्याची जबाबदारी (हॅण्डलर) पोलिस अंमलदार सुदर्शन गवळी व विजय चव्हाण यांच्यावर असणार आहे. रॉक्सीच्या नामकरणावेळी पोलिस उपायुक्त डॉ. अश्विनी पाटील, ‘बीडीडीएस’ प्रमुख पोलिस उपनिरीक्षक अविनाश नळेगावकर उपस्थित होते. ते श्वान चार महिन्यांचेच आहे, पण दणकट व खूप चपळ आहे. त्यामुळे पोलिस आयुक्तांनी तिचे नाव ‘रॉक्सी’ ठेवले आहे.
‘माया’ची पोलिसांना झाली खूप मदत
सोलापूरच्या शहर पोलिसात १२ ऑक्टोबर २०१५ रोजी ‘माया’ हे फिमेल श्वान दाखल झाले होते. प्रशिक्षण पूर्ण करून माया ७ सप्टेंबर २०१६ पासून शहर पोलिसांच्या सेवेत दाखल झाली होती. बॉम्बशोधक व नाशक पथकासाठी माया मोठी आधार होती. ८ ऑक्टोबर २०१८ रोजी सोलापुरातील मरिआई पोलिस चौकीच्या परिसरात एक संशयित बॅग सापडली होती. त्या बॅगेत १८ नग नॉन-इलेक्ट्रिक डिटोनेटर व दोन पेन्सिल सेल, तांब्याचे रील, माचिस अशा वस्तू होत्या. तसेच भीमा-कोरेगाव येथील बंदोबस्तावेळी पार्किंगमध्येही मायाने इंडिकेशन दिले. तेथे स्मोकलेस बॉम्ब निदर्शनास आला होता. २१ सप्टेंबर २०२५ रोजी मायाचे निधन झाले. त्याबदल्यात आता नवे श्वान आणले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.