आरपीआय लढविणार विधानसभा; आठवलेंनी केली 'इतक्या' जागांची मागणी

वृत्तसंस्था
शनिवार, 3 ऑगस्ट 2019

मोदी उस्तादांचा उस्ताद आहे, जाती धर्माच्या पलीकडे गेलेला माणूस आहे. आमची मतपत्रिकेवर निवडणुकीला समोरे जाण्याची तयारी आहे, तरीही मोदी जिंकले तर पुन्हा मतदान केंद्र ताब्यात घेतले, अधिकाऱ्यांनी शिक्के मारले असा आरोप करतील.

- रामदास आठवले, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री

पुणे : विधानसभेसाठी 22 जागांसाठी पत्र दिले आहे. त्यातील 10 जागा मिळाल्या पाहिजेत. पुण्यातून कॅन्टोन्मेंट व पिंपरी या दोन जागांची मागणी केली आहे, असे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सांगितले. तसेच आता मोदींना मतदान मिळतेय म्हणून इव्हीएमवर संशय घेतला जात आहे, असेही ते म्हणाले.

पुण्यात नवीन विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत आठवले यांनी संवाद साधला. यावेळी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, शहराध्यक्ष अशोक कांबळे, राजाभाऊ सरोदे उपस्थित होते. यावेळी त्यांनी राज ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, राज ठाकरे यांना दुसरा कोणताही उद्योग नाही. त्यामुळे ते इव्हीएमच्या विरोधात बोलत आहेत. इव्हीएमवर ममता बॅनर्जी यांना भेटून काय होणार आहे? असा प्रश्न उपस्थित केला. तसेच राज ठाकरे यांनी आता पक्ष वाढविण्याकडे लक्ष द्यायला हवे, अशा शब्दांत रामदास आठवले यांनी खिल्ली उडवली.

मोदी उस्तादांचा उस्ताद 

मोदी उस्तादांचा उस्ताद आहे, जाती धर्माच्या पलीकडे गेलेला माणूस आहे. आमची मतपत्रिकेवर निवडणुकीला समोरे जाण्याची तयारी आहे, तरीही मोदी जिंकले तर पुन्हा मतदान केंद्र ताब्यात घेतले, अधिकाऱ्यांनी शिक्के मारले असा आरोप करतील.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: RPI will contest Assembly Election Ramdas Athawale Demands 10 Seats