Dasara 2022 : लोकसंख्या आटोक्यात आणण्याचं संघाचं लक्ष्य?

विजयादशमीच्या मेळाव्यात मोहन भागवतांचं 'पॉप्युलेशन'बाबत मोठं विधान
Mohan Bhagwat News
Mohan Bhagwat Newsesakal
Updated on

नागपूरः राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी मेळावा सकाळी संपन्न झाला. प्रत्येक वर्षी संघाच्या मेळाव्यातून काहीतरी संदेश अथवा उपदेश देण्याचा प्रयत्न केला जातो. यावर्षी महिला सशक्तीकरणासह सरसंघचालक मोहन भागवत यांनी आणखी एका मुद्द्याला हात घातला.

1925मध्ये दसऱ्याच्या मुहूर्तावर संघाची स्थापना झाली. डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी संघविचार प्रसाराचं काम सुरु केलं. आजच्या दिवशी संघाचं देशभर पथसंचलन चालतं. नागपुरात आयोजित मेळाव्यात यावर्षी पहिल्यांदाच एका महिलेची प्रमुख उपस्थितीमध्ये उपस्थिती होती.

संघाच्या दसरा मेळाव्यात एव्हरेस्ट विजेत्या पद्मश्री संतोष यादव या विशेष उपस्थितीमध्ये होत्या. त्यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासह शस्त्रपूजन केलं. त्यानंतर मोहन भागवत यांनी लोकसंख्या नियंत्रणाबात महत्त्वाचं भाष्य केलं.

Mohan Bhagwat News
Shivsena: मेळाव्याआधीच धनुष्यबाणाचा निर्णय होणार? आयोगासमोर आजच युक्तीवाद

भागवत म्हणाले की, आपल्या देशात लोकसंख्या नियंत्रणासाठी कायदा करण्याची गरज आहे. असा कायदा जो सर्वांना समान पद्धतीने लागू व्हायला हवा. कुणालाही त्यातून मुभा मिळाली नाही पाहिजे. चीनमध्ये जेव्हा लोकसंख्या वाढतेय, असं वाटलं तेव्हा त्यांनी त्यावर नियंत्रण आणलं. आपल्यालाही आता जागरुक असणं गरजेचं आहे.

"सध्या देशात 70 कोटी तरुण आहेत. त्यामुळे देशात नोकऱ्यांमध्ये व्यस्ततेचं प्रमाण आहे. एकटं सरकार काय करेल? जनतेचीही तेवढीच जबाबदारी आहे. त्यामुळे सामाजिक, नैसर्गिक समतोल अत्यंत गरजेचा आहे. हा केवळ देशाचा प्रश्न नाही तर जन्म देणाऱ्या मातांचाही आहे." असंही भागवत म्हणाले.

Mohan Bhagwat News
Dasra Melava : संपूर्ण जग आता भारताचं ऐकतंय, देशाचं वजन वाढलंय - मोहन भागवत

लोक विचारायचे, तुम्ही संघी आहात का?- यादव

एव्हरेस्ट विजेत्या पद्मश्री संतोष यादव यांनीही आपलं मनोगत व्यक्त केलं. त्या म्हणाल्या, पूर्वी लोक मला विचारायचे की, तुम्ही संघी आहात का? परंतु संघी असणं म्हणजे काय? हे मला माहिती नव्हतं. आता माझं नशिबच मला संघाच्या सर्वोच्च मंचावर घेऊन आलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com