RTO Employees Protest : राज्यातील आरटीओचे कामकाज होणार ठप्प; परिवहन कर्मचाऱ्यांचा सोमवारी दोन तास आंदोलन

प्रलंबित मागण्यांसाठी दोन तास करणार आंदोलन ; मोटार वाहन विभाग कर्मचारी संघटनेचा निर्णय !
RTO work stopped in state Two hours protest of transport employees on Monday mumbai
RTO work stopped in state Two hours protest of transport employees on Monday mumbaiesakal

मुंबई : राज्यातील प्रादेशिक परिवहन कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यासाठी सोमवारी दोन तास आंदोलन करण्याचा निर्णय मोटार वाहन विभाग (आरटीओ) कर्मचारी संघटने घेतला आहे. त्यामुळे राज्यातील सर्व आरटीओमधील कामकाज सकाळच्या सत्रात दोन तास ठप्प असणार आहे.

शासनाच्या धोरणानुसार प्रत्येक विभागाचा आकृतीबंध तयार करणे बंधनकारक करण्यात आले आहे, आकृतीबंधाचा प्रस्ताव कर्मचारी संघटनेने प्रशासनास २०१६ साली सादर केला होता, आकृत्तीबंध मंजूरीसाठी संघटनेने सलग सहा वर्षे प्रखर लढा दिल्यानंतर त्यासंबंधीचा शासन निर्णय २३ सप्टेंबर २०२३ रोजी प्रसिद्ध झाला.

शासन निर्णय सहा महिन्यांहून अधिक काळ होऊनही आकृत्तीबंध कार्यान्वित होऊन अंमलबजावणी होत नसल्याने कर्मचारी वर्गात अस्वस्थता पसरली असून नाराजी व संताप व्यक्त केला जात आहे. या साठीच संघटनेच्या वतीने सोमवार सकाळच्या सत्रात दोन तास उग्र आंदोलनासहित लेखणीबंद आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहेत.

विभागातील पदोन्नतीचे सत्र नाहक प्रलंबित ठेवले आहे, यामुळे कर्मचा-यांचे आर्थिक नुकसान होत असून, सेवाविषयक उन्नतीपासून वंचित ठेवले जात आहे, पात्र कर्मचा-यांवर हा अन्याय आहे. वर्ग-२ ची पदे कित्येक वर्षांपासून रिक्त आहेत.

यामुळेही कर्मचारी वर्गात संताप आहे. कामकाजात एकसूत्रता नसल्याने संघटनेने केलेल्या मागणी नंतर कळसकर समितीचे गठण करण्यात आले, त्या समितीचा अहवाल सादर करुन दोन वर्षाहून अधिकचा काळ झाला आहे. संपूर्ण राज्यात कामकाजात एकसूत्रता नसल्याने कर्मचा-यांना नाहक त्रास होत असून कामकाज करताना अडचणींचा सामना करावा लागतो, या मुळे कर्मचारी वर्गावर नाहक कारवाई केली जात असते.

जनतेलाही त्याचा त्रास होत आहे.अहवालाची अंमलबजावणी त्वरीत करावी ही देखील मागणी प्रलंबित आहे. शासन/प्रशासनाने मोटार वाहन विभागातील कर्मचा-यांच्या रास्त मागण्यांवर सत्वर कार्यवाही करावी अन्यथा तीव्र संघर्षाशिवाय पर्याया रहाणार नाही असा इशाराही मोटार वाहन विभाग (आरटीओ) कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस सुरेंद्र सरतापे यांनी दिली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com