पुणे - 'राज्यात अतिवृष्टीमुळे उडीद, सोयाबीन, ऊस, कापूस व फळबागांचेही नुकसान झाले आहे. प्रशासनास पंचनामे करण्यास सांगितले आहे. अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना आवश्यक मदत करण्याच्या सूचना मुख्यमंत्री व आम्ही प्रशासनास दिल्या आहेत..त्याचबरोबर माणुसकीच्या नात्याने काम करा, असेही सांगितले आहे. शेतकऱ्यांना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी, सावरण्यासाठी वेळप्रसंगी नियम शिथिल करू किंवा बाजूला करू.' असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी सांगितले..उपमुख्यमंत्री पवार हे शुक्रवारी पुणे शहराच्या दौऱ्यावर होते. शासकीय विश्रामगृह येथे महाडासंबंधी बैठक झाली, त्यानंतर पवार यांनी राज्यातील अतिवृष्टीच्या परिसरातील पाहणीबाबतची माहिती देत राज्य सरकारकडून केल्या जाणाऱ्या उपाययोजनांबाबत माध्यमांशी संवाद साधला..पवार म्हणाले, 'अतिवृष्टी झालेल्या भागांमध्ये मी अडीच दिवसांचा दौरा केला. त्यामध्ये शेतकऱ्यांशी संवाद साधला, झालेल्या नुकसानीची पाहणी केली आहे. अजूनही पाऊस सुरू आहे. अनेक नागरिक पुरामध्ये अडकलेले आहेत. त्यांचा बचाव करण्याचे काम प्रशासन करत आहे..सध्या पाणी घरात शिरलेल्या नागरिकांना पाच हजार रुपयांची मदत व 10 किलो धान्य देण्यात येणार आहे. मात्र धान्य जास्त देण्याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करत आहोत. उडीद, सोयाबीन, ऊस, कापूस, मका, कांदा, फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, त्यानुसार पंचनामे करण्यास सांगितले आहे. पंचनामे करतानाही माणुसकीच्या नात्याने विचार करा अशा सूचना दिल्या आहेत.'.केंद्र सरकारकडे मदतीसाठी केलेल्या मागणीबाबत पवार म्हणाले, "गृहमंत्री अमित शहा मुंबई येथे आले होते. त्यांच्याशी पूरस्थितीबाबत आम्ही चर्चा केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही राज्याला मदत करण्यासंदर्भात पत्र पाठविले आहे. सध्याच्या संकटावर मात करण्यासाठी, लोकांना मदत करण्यासाठी केंद्र सरकारने मदत करावी..राज्यांवर येणाऱ्या नैसर्गिक आपत्तीवेळी केंद्र सरकार आपत्ती निवारणातून राज्याला मदत करत असते. पंजाब, हिमाचल या राज्यांना केंद्राने नुकतीच मदत केली आहे. त्यानुसार, पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रालाही केंद्राने मदत करावी अशी मागणी केली आहे.'पुणे सायकल स्पर्धेबाबत पवार म्हणाले, 'युसीआयची बैठक रवांडामध्ये झाली. त्यामध्ये पुणे सायकल स्पर्धेला मान्यता मिळाली आहे. पुण्यात आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धा होणार आहे, त्यासोबतच ऑलिम्पिक स्पर्धाही होणार आहे. त्यामुळे पुण्याचा लौकिक जगभरात पोचणार आहे. पुण्याच्या पर्यटनवाढीसह विकासाला चालना मिळेल.'.'ते' शब्द मी वेगळ्या उद्देशाने वापरले!'ग्रामीण भागात लोकांना समजण्यासाठी मी 'पैशांचे सोंग आणता येत नाही' असे बोललो. ते शब्द मी वेगळ्या उद्देशाने वापरले. मात्र विरोधक कारण नसताना गैरसमज निर्माण करत आहेत. नैसर्गिक संकट येते, त्यानुसार आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे आहोत. जास्त काम करणाऱ्यालाच नेहमी लक्ष्य केले जाते' अशा शब्दात पवार यांनी त्यांच्यावरील टीकेला उत्तर दिले..पवार म्हणाले,- म्हाडाच्या सोसायट्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सर्व विभाग एकत्र आणल्याशिवाय मार्गी लागणार नाही- लाडकी बहिणींबाबतच्या बातमीमध्ये तथ्य नाही, त्याविषयी मुख्यमंत्र्यांच्या स्तरावर चर्चा होईल.- ट्रम्पचा निर्णय ते घेतील, आपण स्वदेशीचा नारा देऊन आपले निर्णय घ्यायचे.- परदेशी वस्तूंपेक्षा चांगल्या वस्तू आपल्याकडे तयार होतात- धाराशीवचे जिल्हाधिकाऱ्यांनी नृत्य केल्याबद्दल मला माहिती नाही.- गंभीर तक्रारी येतात, तेव्हा त्यांची तक्रार घ्यावीच लागते. त्यानुसार त्याची चौकशी करत- हवामान विभागाने दिलेल्या सूचनेनुसार प्रशासनाला सतर्क राहण्यास सांगितले..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.