
राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटनांमुळे महिला आयोगाच्या भूमिकेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्त्या संगिता भालेराव यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्यावर सोशल मीडियावर टीका करणारी पोस्ट केली होती. या पोस्टनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवती सेलच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सोनाली गाडे यांनी भालेराव यांना फोनवरून धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.