esakal | अमृता फडणवीसांच्या शायरीला रुपाली चाकणकरांचं 'तुफाँ तो इस शहर ने अक्सर झेला है'नं उत्तर
sakal

बोलून बातमी शोधा

Rupali Chakankar

अमृता फडणवीसांच्या शायरीला रुपाली चाकणकरांचं 'तुफाँ तो इस शहर ने अक्सर झेला है'नं उत्तर

sakal_logo
By
बाळकृष्ण मधाळे

सातारा : देशावर कोरोना (Coronavirus) संकट असतानाच चक्रीवादळानं (Cyclone Tauktae) एक नवं संकट नागरिकांसमोर उभं ठाकलं आहे. गुरुवारपासून सुरु झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यानं शुक्रवारी चक्रीवादळाचं रुप घेतलं आणि लक्षद्वीप, तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरातच्या किनारपट्टी भागात या चक्रीवादळाचा तडाखा पाहायला मिळाला. खवळलेला समुद्र आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळं किनारी भागात मोठं नुकसान झालं, तर बहुतांश भागांमध्ये मुसळधार पावसानं झोडपलं. रविवारी या वादळाचा मोठा फटका गुजरातला देखील बसलाय. मात्र, अद्यापही या वादळाची भीती नागरिकांत कायम आहे. एकीकडे या वादळचं संकट ओढावला असताना, सोशल मीडियावर मात्र या वादळाची खिल्ली उडवली जात आहे, तर राजकीय नेत्यांतही या वादळीची शेरो-शायरीव्दारे खंमग चर्चा सुरु आहे. (Rupali Chakankar Criticism On Amruta Fadanvis Social Media Cyclone Tauktae)

सध्या सोशल मीडियावर अनेकजण या वादळाची खिल्ली उडवताना दिसत आहे, तर काहीजण फेसबुक, ट्विटर, व्हाॅटसअॅप व इतर माध्यमांव्दारे संदेशपर आवाहन करताहेत. यातच आता सोशल मीडिया वापरकर्त्यांनी पावसाळी कवी बनून हलके-फुलके विनोद, चारोळी, फोटो, व्हिडिओ आणि मीम्स बनवून सोशल मीडियावर हास्याचं वादळ उठवलंय. या सोशल वादळात राजकीय पुढारी देखील मागे नाहीत. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृत फडणवीस (Amruta Fadanvis) यांनीही शायरी लिहून महाराष्ट्र सरकारला टोला लगावत ठाकरे सरकारवर ताशेरे ओढले आहेत.

हेही वाचा: तुम्ही करुन दाखवलं; महाराष्ट्राची देशात उंचावली मान : उद्धव ठाकरे

या सोशल 'वादळात' राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकरांनी (Rupali Chakankar) देखील सरकारची बाजू घेत शायरीच्याच माध्यमातून अमृता फडणवीसांवर जोरदार पलटवार करत चांगलाच समाचार घेतलाय. अमृता फडणवीस यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, "तुफाँ तो इस शहर में अक्सर आता है! देखें अबके किसका नंबर आता है !" अशा आशयाचं ट्विट करुन त्यांनी सरकारवर टीका केलीय.

अमृता फडणवीसांच्या ट्विटला उत्तर देताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी, "तुफां तो इस शहर ने अक्सर झेला है! महाराष्ट्र इसके साथ हमेशा खेला है, साथ मैं हिंदोस्तां को भी संभाला है!" अशा आशयाचे ट्विट करत अमृता फडणवीसांच्या ट्विटला शायरीतून पलटवार केलाय. या त्यांच्या ट्विटची चर्चा सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असून चक्रीवादळात हे ट्विटचं वादळ चांगलचं थैमान माजवतंय.

Rupali Chakankar Criticism On Amruta Fadanvis Social Media Cyclone Tauktae