

Rupali Chakankar Faces Probe After Resignation Party Signals Action in Ashok Kharat Case
Esakal
Rupali Chakankar May Face Probe नाशिकच्या तथाकथित भोंदू बाबा कॅप्टन अशोक खरातशी संबंधित प्रकरणामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर चांगल्याच अडचणीत आल्या आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा चाकणकर यांनी राजीनामा दिलाय. राजीनाम्यात त्यांनी वादाचा उल्लेख टाळत केवळ वैयक्तिक कारणास्तव राजीनामा देत असल्याचं म्हटलंय. दरम्यान, या वादाच्या पार्श्वभूमीवर पक्षनेत्यांनी या प्रकरणापासून हात झटकले आहेत. संबंधित प्रकरण अत्यंत गंभीर आणि घृणास्पद असल्याचे सांगत, या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई होणार असल्याचेही संकेत दिले आहेत. त्यामुळे दोन दिवसांत चाकणकर यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता पक्षातील सूत्रांनी दिली.