

SIT inquiry followed by possible ED action against Rupali Chakankar भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण समोर आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला. यानंतर नुकतीच त्यांची खरात प्रकरणी एसआयटी चौकशीही करण्यात आली. तब्बल पाच तास चाललेल्या या चौकशीत चाकणकर यांना ४५ प्रश्न विचारण्यात आले. दरम्यान, एसआयटी चौकशीनंतर रुपाली चाकणकर ईडीच्या रडारवर आल्या आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ईडीकडून रुपाली चाकणकर यांना समन्स बजावण्यात आले आहेत. पदाचा दुरुपयोग करत आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप करण्यात आल्याची माहिती समजते.