Rupali Chakankar : चाकणकरांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून हटवा; धनंजय मुंडेंच्या बायकोची मागणी Rupali chakankar should be removed post chairperson of commission women karuna Munde demand to cm Eknath shinde and Devendra Fadnavis | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rupali Chakankar

Rupali Chakankar : चाकणकरांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून हटवा; धनंजय मुंडेंच्या बायकोची मागणी

रुपाली चाकणकर यांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून हटवा अशी मागणी करुणा मुंडे यांची लेखी पत्राद्वारे मुख्यमंत्री, एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे, तसेच केंद्रीय महिला आयोगाला देखील तक्रार दिली आहे. महिला आयोगाचे जे पद आहे, हे न्यायी संस्थेचे पद आहे. रुपाली चाकणकर महिला आयोग पदाचा गैरवापर करत असल्याचंही त्यांनी या पत्रात म्हंटलं आहे.

या पत्रात करुणा मुंडे यांनी म्हटले आहे की, रुपाली चाकणकर त्यांच कामं निष्पक्षपातिपने करत नाहीत.या शिवाय अनेक गंभीर आरोप असलेल्या नेत्यांसोबत असलेल्या फोटो आज ही त्यांच्या फेसबुक वॉलवर दिसून येत आहेत. या शिवाय तक्रारदार महिलां आयोगात तक्रार घेऊन आल्यावर तेथून फोटो त्या व्हिडीओ प्रसारित करतात या मुळे या महिलांची ओळख समाजापुढे येत आहे असंही त्यांनी म्हंटलं आहे.

त्याचबरोबर महिला ज्या महिला त्यांच्याकडे न्यायासाठी तक्रार घेऊन येतात, त्यांना न्याय तर भेटत नाही. तर त्या महिलांसोबत फोटो आणि व्हिडिओ काढून सोशल मीडियावर व्हायरल करतात आणि राजकारण करतात. ज्या मोठ्या लोकांच्या तक्रारी त्यांच्याकडे केल्या आहेत त्या व्यक्तिसोबत त्यांचे फोटो आहेत. ते आजपर्यंत त्यांच्या सोशल मीडियावर आहेत, त्यांनी काढलेले नाहीत, त्याच्यामुळे लेखी पत्राद्वारे मुख्यमंत्री, आणि उपमुख्यमंत्र्याकडे आणि केंद्रीय महिला आयोगाला ही तक्रार केली असल्याचे करुणा मुंडे यांनी यावेळी सांगितले आहे. या सर्व कारणांमुळे रुपाली चाकणकर यांची आयोगाच्या अध्यक्ष पदावरून मुक्तता करा अशी मागणी करुणा मुंडे यांनी केली आहे.