मविआ नेत्यांमधील वाद कसब्यापर्यंत पोहोचलाय त्यामुळं...; भाजपचा मोठा दावा : Kasba By Election | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

congress nana patole on bjp Chandrashekhar Bawankule Kasba peth bypoll mukta tilak politics news

Kasba By Election: मविआ नेत्यांमधील वाद कसब्यापर्यंत पोहोचलाय त्यामुळं...; भाजपचा मोठा दावा

पुणे : महाविकास आघाडीच्या नेत्यांमधील वाद आता कसब्यापर्यंत पोहोचला आहे. त्यामुळं कसब्यातही महाविकास आघाडीत धुसफूस सुरु आहे, याचा फटका त्यांना नक्कीच बसणार आहे. शिवाजी महाराजांचा कसबा हा भाजपचाच राहणार असा विश्वास भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी व्यक्त केला आहे. (Kasba By Election dispute between MVA leaders has reached Kasba Big claim of BJP)

मुळीक म्हणाले, कसबा विधानसभा निवडणूक आम्ही सगळे मित्रपक्ष एकत्र लढवत आहोत. ही निवडणूक आमच्याकडे झुकलेली आहे. कालच्या महाविकास आघाडीच्या सभेला मिळालेला प्रतिसाद कमी होता. प्रचारात देखील आम्ही खूप पुढं आहोत. महाविकास आघाडी प्रचारात देखील मागे आहे. उलट आमचा प्रतिसाद वाढतो आहे. त्यामुळं ही निवडणूक आम्हीच जिंकू असा विश्वासही यावेळी मुळीक यांनी व्यक्त केला.

महाविकास आघाडीतील नेत्यांचा वाद कसब्यापर्यंत

नाना पटोले, रोहित पवार, प्रणिती शिंदे आणि संजय राऊत यांचा जो वाद आहे तो कसब्यापर्यंत आला आहे. यांच्यात कसबा मतदारसंघात देखील धुसपूस सुरु आहे. याचा फटका त्यांना नक्की बसणार. आम्ही प्रत्येक बूथपर्यंत पोहोचलो आहोत. प्रत्येक प्रभागला एक आमदार आम्ही दिला आहे. कसबा हा भाजपचाच बालेकिल्ला आहे. शिवाजी महाराजांचा कसबा हा भाजपचाच आहे आणि तो आमच्याच हातात राहणार आहे, अशा शब्दांत जगदीश मुळीक यांनी महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला.